कळमेश्वरमध्ये १.९० लाखाचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:07 AM2021-06-03T04:07:51+5:302021-06-03T04:07:51+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कळमेश्वर : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध सुरू केले. मात्र, ग्रामीण भागात त्याचे पालन हाेताना ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
कळमेश्वर : काेराेनाचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध सुरू केले. मात्र, ग्रामीण भागात त्याचे पालन हाेताना दिसत नसल्याने अखेर स्थानिक प्रशासनातर्फे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई माेहीम राबविली. त्यानुसार कळमेश्वर-ब्राह्मणी नगर परिषदेने १ एप्रिल ते ३१ मेपर्यंत १ लाख ९० हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे.
गेल्या दाेन महिन्यांत नगर परिषद प्रशासनाच्या पथकाने शहरात विशेष माेहीम राबविली. विनाकारण फिरणाऱ्यांवर तसेच लाॅकडाऊन काळात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाई केली गेली. लाॅकडाऊनदरम्यान ही कारवाई सुरूच राहणार असून, प्रत्येकाने शासनाने दिशानिर्देशित केलेल्या नियमांचे पालन करावे, विनाकारण शहरात फिरू नये, मास्क व सॅनिटायझरचा वापर करावा तसेच शहरातील ४५ वर्षांवरील सर्व नागरिकांनी काेविड प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन मुख्याधिकारी स्मिता काळे यांनी केले आहे.