लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११पर्यंत १९.१७ टक्के मतदान
By जितेंद्र ढवळे | Updated: April 19, 2024 14:00 IST2024-04-19T13:58:43+5:302024-04-19T14:00:23+5:30
पहिल्या टप्प्यातील ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी वाचा

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात सकाळी ११पर्यंत १९.१७ टक्के मतदान
नागपूर: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे.
पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-
- रामटेक- १६.१४ टक्के
- नागपूर- १७.५३ टक्के
- भंडारा- गोंदिया १९.७२ टक्के
- गडचिरोली- चिमूर २४.८८ टक्के
- चंद्रपूर- १८.९४