दस्तनोंदणीतून नागपूर जिल्ह्याला १९२६.२० कोटींची कमाई; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची कामगिरी

By मोरेश्वर मानापुरे | Published: April 2, 2024 08:16 PM2024-04-02T20:16:33+5:302024-04-02T20:16:40+5:30

नागपूर ग्रामीणला १ एप्रिल-२०२३ ते ३१ मार्च-२०२४ या काळात एकूण ५४०४२ दस्तनोंदणीतून ४५० कोटींच्या उद्दिष्टांच्या तुलनेत ४७१.८६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

1926.20 crores earned to Nagpur district from deed registration | दस्तनोंदणीतून नागपूर जिल्ह्याला १९२६.२० कोटींची कमाई; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची कामगिरी

दस्तनोंदणीतून नागपूर जिल्ह्याला १९२६.२० कोटींची कमाई; नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाची कामगिरी

नागपूर : जीएसटीनंतर राज्याला सर्वाधिक महसूल देणाऱ्या विभागांमध्ये नोंदणी शुल्क विभागाचा क्रमांक लागतो. आर्थिक वर्ष-२०२३-२४ मध्ये नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने नागपूर जिल्ह्यात १९२६.२० कोटी रुपयांची कमाई केली. यामध्ये नागपूर शहर १४५४.३४ कोटी आणि नागपूर ग्रामीणचा ४७१.८६ कोटींचा सहभाग आहे. गेल्यावर्षी रेडिरेकनर दरात वाढ केलेली नसतानाही दस्तनोंदणी वाढली आहे. शिवाय विभागाने जुन्या दस्तांसाठी अभय योजना राबविली. ही योजना पुढेही सुरू राहणार आहे. आर्थिक वर्षात घरखरेदीला मोठा प्रतिसाद मिळाला.

नागपूर ग्रामीणला १ एप्रिल-२०२३ ते ३१ मार्च-२०२४ या काळात एकूण ५४०४२ दस्तनोंदणीतून ४५० कोटींच्या उद्दिष्टांच्या तुलनेत ४७१.८६० कोटी रुपयांचा महसूल मिळाला. नागपूर ग्रामीणची गोळा झालेल्या महसूलाची टक्केवारी १०४.८५ टक्के असल्याची माहिती नागपूर ग्रामीणचे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय तरासे यांनी दिली. तर नागपूर शहर विभागाला एकूण ९४९६० दस्तनोंदणीतून १५०० कोटींच्या उद्दिष्टांच्या तुलनेत १४५४.३४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला. गोळा झालेल्या महसूलाची टक्केवारी ९७ टक्के असल्याची माहिती नागपूर शहरचे सह जिल्हा निबंधक वर्ग-१ तथा मुद्रांक जिल्हाधिकारी तानाजी गंगावणे यांनी दिली.

नागपूर ग्रामीण कार्यालय :

महिना दस्त संख्या जमा महसूल (कोटी)
एप्रिल-२३ ४३९८ २५.६७२
मे ५११६ ३५.४१४
जून ५०८५ ३६.६५७
जुलै ४२८२ ४२.७९६
ऑगष्ट ४३३० ३७.५२६
सप्टेंबर ३४५० ६४.०११
ऑक्टोबर ३७५२ २९.०१२
नोव्हेंबर ३५६५ २९.५९७
डिसेंबर ४४३४ ४१.३०१
जाने.-२४ ४७७७ ३९.५२६
फेब्रुवारी ५२५५ ४२.६८८
मार्च ५५९८ ४७.६६०
एकूण ५४०४२ ४७१.८६०
- एकूण उद्दिष्ट ४५० कोटी
- साध्य उद्दिष्ट ४७१.८६० कोटी
एकूण टक्केवारी १०४.८५ टक्के

नागपूर शहर कार्यालय :

महिना दस्त संख्या जमा महसूल (कोटी)
एप्रिल-२३ ६८५५ ७१.२९
मे ८१७२ १०३.६४
जून ७४७१ १२३.१६
जुलै ८२१० ११०.८५
ऑगस्ट ८२०७ १११.५८
सप्टेंबर ७१५६ १११.५०
ऑक्टोबर ७९०४ १००.७३
नोव्हेंबर ७४२३ १०३.८३
डिसेंबर ८३७० १२०.२३
जाने.-२४ ८३४१ २३६.५९
फेब्रुवारी ८९१० १२८.५१
मार्च ७९४१ १३२.४३
एकूण ९४९६० १४५४.३४
- एकूण उद्दिष्ट १५०० कोटी
- साध्य उद्दिष्ट १४५४.३४ कोटी
एकूण टक्केवारी ९६.९६ टक्के

Web Title: 1926.20 crores earned to Nagpur district from deed registration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.