ठरलं! आठ वर्षांत पूर्ण होईल नागनदी प्रकल्प; परिसराचा लूकही बदलेल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2023 01:28 PM2023-01-19T13:28:44+5:302023-01-19T13:31:53+5:30
फ्रान्स सरकारकडून १९२७ कोटींचे अर्थसहाय्य : आराखडा पूर्ण, पहिल्या टप्प्यात मलनिस्सारण वाहिन्यांचे काम
नागपूर : नागनदी प्रदूषण निर्मूलन प्रकल्प हा नागपूरसाठी महत्त्वाकांक्षी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच या प्रकल्पाचे भूमिपूजन केले आहे. या प्रकल्पाला किमान ८ वर्षे लागणार असून, यावर १९२७ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च फ्रान्स सरकार करणार आहे.
समृद्धी महामार्गाच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले असता त्यांच्याहस्ते नागनदी सौंदर्यीकरण प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पाचा आराखडा आयआयटी रुडकीच्या तज्ज्ञांनी तयार केला. त्यासाठी नागनदीची सद्यस्थिती, सिव्हरेज ट्रीटमेंट प्लॅण्ट, शुद्ध होणाऱ्या पाण्याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच अंबाझरी, व्हीएनआयटी, संगम चाळ, अशोक चौक, नंदनवनजवळच्या भागाची पाहणी केली. नागनदीच्या काठावर वॉकिंग ट्रॅक त्यावर आकर्षक विद्युत व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. नदीच्या सभोवताल ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचरा पेटीची सोय करण्यात येणार आहे. नागनदीच्या सभोवताल १५ मीटर ‘नो डेव्हल्पमेंट झोन’ असणार आहे.
पहिल्या टप्प्यात ५२० किलोमीटरपर्यंतच्या मलनिस्सारण वाहिन्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात सल्लागारांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर निविदा काढल्या जातील. त्यानंतर तीन महिन्यांचा अवधी दिला जाईल. ऑक्टोबर महिन्यात नागनदी सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी माहिती असल्याची माहिती तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मोहम्मद इजराईल यांनी दिली.
- ७ नवीन पंपिंग स्टेशन राहतील
प्रारंभी नागनदी, पिवळी नदी आणि पोहरा नदीच्या लगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्यात येतील. ५२० किमीच्या सिवरेज लाइन टाकण्यात येणार असून, ७ नवीन पंपिंग स्टेशन राहतील. दोन इलेक्ट्रिकल दहनघाट, दोन सिवर क्लिनिंग मशीन लावण्यात येतील.
पहिल्या टप्प्यात काम ५२० कि.मी.ची ड्रेनेज सिस्टिम
पहिल्या टप्प्यात ५२० किलोमीटरपर्यंतच्या मलनिस्सारण वाहिन्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यात सल्लागारांची नियुक्ती केली जाईल. त्यानंतर निविदा काढल्या जातील. त्यानंतर तीन महिन्यांचा अवधी दिला जाईल. ऑक्टोबर महिन्यात नागनदी सौंदर्यीकरणाच्या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल, अशी माहिती असल्याची माहिती तांत्रिक सल्लागार (नद्या व सरोवरे) मोहम्मद इजराईल यांनी दिली.
वॉकिंग ट्रॅक अन् आकर्षक लायटिंग
नागनदीची सद्यस्थिती, सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांट, शुद्ध होणाऱ्या पाण्याबाबत माहिती जाणून घेतली. तसेच अंबाझरी, व्हीएनआयटी, संगम चाळ, अशोक चौक, नंदनवनजवळच्या भागाची पाहणी केली. नागनदीच्या काठावर वॉकिंग ट्रॅक त्यावर आकर्षक विद्युत व्यवस्था तयार करण्यात येणार आहे. नदीच्या सभोवताली ठिकठिकाणी कचरा टाकण्यासाठी कचरापेटीची सोय करण्यात येणार आहे. नागनदीच्या सभोवताली १५ मीटर 'नो डेव्हल्पमेंट झोन' असणार आहे.
केंद्र ६० टक्के, राज्य २५ टक्के, मनपा १५ टक्के भागीदारी
पहिल्या टप्पात ११०० कोटींचा खर्च अपेक्षित असून, यात केंद्र सरकारची ६० टक्के, राज्य शासनाची २५ टक्के अनुदान राहील. महानगरपालिकेची केवळ १५ टक्के भागीदारी राहील. त्यानंतर नागनदीच्या दर्शनी भागाचे सौंदर्यीकरण करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, त्यांच्याच अथक प्रयत्नामुळे हा प्रकल्प मार्गी लागत- असल्याचे मोहम्मद इजराईल यांनी सांगितले.