नागपुरात  पार्सलमधून होणारी १९.७५ लाखाची सोन्याची तस्करी पकडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2018 08:58 PM2018-05-31T20:58:38+5:302018-05-31T20:58:54+5:30

कुरिअरच्या माध्यमातून मुंबईवरून नागपूरला दुरांतो एक्स्प्रेसने होणारी १९ लाख ७५ हजाराची सोन्याची तस्करी गुरुवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली आहे. दरम्यान पकडलेल्या सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांची कुठलीही रसिद संबंधित कुरिअरच्या कर्मचाऱ्याकडे नसल्यामुळे हे दागिने पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या सुर्पुद करण्यात आले आहेत.

19.5 lacs of gold smuggling from Parcel were seized in Nagpur | नागपुरात  पार्सलमधून होणारी १९.७५ लाखाची सोन्याची तस्करी पकडली

नागपुरात  पार्सलमधून होणारी १९.७५ लाखाची सोन्याची तस्करी पकडली

googlenewsNext
ठळक मुद्देआरपीएफची कारवाई : सोने-चांदी, हिऱ्याचे दागिने जप्त

लोकमत न्यूज नेटवर्क 
नागपूर : कुरिअरच्या माध्यमातून मुंबईवरून नागपूरला दुरांतो एक्स्प्रेसने होणारी १९ लाख ७५ हजाराची सोन्याची तस्करी गुरुवारी सकाळी रेल्वे सुरक्षा दलाने पकडली आहे. दरम्यान पकडलेल्या सोन्या-चांदीच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांची कुठलीही रसिद संबंधित कुरिअरच्या कर्मचाऱ्याकडे नसल्यामुळे हे दागिने पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या सुर्पुद करण्यात आले आहेत.
रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त ज्योती कुमार सतीजा यांनी रेल्वे मार्गाने होणारी अवैध तस्करी रोखण्यासाठी गठित केलेल्या चमूतील सदस्य गुन्हे शाखेचे निरीक्षक भगवान इप्पर, आरपीएफ जवान विजय पाटील, डी. डी. वानखेडे, शेषराव लांबट, किशोर चौधरी, निळकंठ गोरे यांना गुप्त बातमीदारातर्फे रेल्वेगाडी क्रमांक १२२८९ मुंबई-नागपूर दुरांतो एक्स्प्रेसने सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार चमूने होम प्लॅटफार्म क्रमांक ८ वर उभ्या असलेल्या दुरांतो एक्स्प्रेसच्या मागील लीज एसएलआर कोचची तपासणी केली असता पार्सल उतरविणाऱ्याकर्मचाऱ्याने संबंधित पार्सल क्विक कुरिअर लॉजिस्टीक सर्व्हिसचे असल्याची माहिती दिली. त्यावर कुरिअर सर्व्हिसच्या कर्मचाऱ्याने तो क्विक कुरिअर लॉजिस्टीक सर्व्हिसमध्ये काम करीत असून पार्सलमध्ये हिरे, सोने, चांदी आणि आर्टिफिशिअल ज्वेलरी असल्याची माहिती दिली. त्याबाबतची कोणतीही रसिद किंवा प्रमाणपत्र संबंधित कर्मचाऱ्याकडे नसल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर हे पार्सल उघडण्यासाठी तसेच पुढील कारवाईसाठी आयकर विभागाला पत्र देऊन आरपीएफ ठाण्यात बोलविण्यात आले. त्यांनी पार्सल उघडून तपासणी केली असता त्यात २ लाख ७९ हजार ६९० रुपयांचे हिरे, १३ लाख ९६ हजार ८९ रुपयांचे सोन्याचे दागिने आणि २ लाख ३५ हजार ५१२ रुपयांचे चांदीचे दागिने आणि ६४ हजार ५३२ रुपयांचे आर्टिफिशिअल ज्वेलरी असा एकूण १९ लाख ७५ हजाराचा मुद्देमाल आढळला. दरम्यान हे दागिने पुढील कारवाईसाठी आयकर विभागाच्या सुपुर्द करण्यात आले.

Web Title: 19.5 lacs of gold smuggling from Parcel were seized in Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.