नागपुरातील २ लाख ६० हजारावर ज्येष्ठांना मिळणार बूस्टर डोस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2022 08:40 PM2022-01-08T20:40:00+5:302022-01-08T20:40:36+5:30
Nagpur News १० जानेवारीपासून लशीचा तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस दिला जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात २,६०,५६८ ज्येष्ठांना बूस्टर जोड मिळणार आहे.
नागपूर : राज्यात २९ लाखांपेक्षा अधिक व्याधीग्रस्त नागरिक ६० वर्षांपेक्षा अधिक वयोगटात आढळून आले आहेत. यासाठी शासनाने घरोघर सर्वेक्षण केले आहे. या सर्वांना १० जानेवारीपासून लशीचा तिसरा डोस अर्थात बूस्टर डोस दिला जाणार आहे. नागपूर जिल्ह्यात २,६०,५६८ ज्येष्ठांना बूस्टर जोड मिळणार आहे. बूस्टर डोसची मोहीम जिल्ह्यात १० जानेवारीपासून राबविण्यात येणार आहे. ज्या ज्येष्ठांनी यापूर्वी कोव्हॅक्सिन लस घेतली त्यांना कोव्हॅक्सिन व ज्यांनी कोविशिल्ड घेतली त्यांना कोविशिल्डचा बूस्टर डोस दिला जाणार आहे.
९ महिने पूर्ण झाले तरच मिळणार ‘ बूस्टर ’
भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्या ज्येष्ठांना दोन्ही डोस घेऊन ९ महिने झाले, त्यांना बूस्टर डोस देण्यात येणार आहे. ज्यांनी कोव्हॅक्सिन घेतली त्यांना कोव्हॅक्सिन व ज्यांनी कोविशिल्ड घेतली त्यांना कोविशिल्डचा बूस्टर डोस देण्यात येणार आहे.
- १० जानेवारीपासून ही मोहीम आम्ही जिल्ह्यात राबविणार आहोत. दोन्ही डोस घेऊन ९ महिने झालेल्यांना म्हणजेच १ एप्रिलच्या पूर्वी दोन्ही डोस घेतलेल्यांना बूस्टर जोड दिला जाईल. बूस्टर डोसच्या संदर्भात संदेश देखील पाठविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रात ही सोय करण्यात आली आहे.
सुमित्रा कुंभारे, उपाध्यक्ष व आरोग्य सभापती, जि.प. नागपूर