वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2022 08:59 PM2022-10-18T20:59:08+5:302022-10-18T20:59:33+5:30
Nagpur News वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक करण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
नागपूर : वीजबिल ‘अपटेड’ करण्याच्या नावाखाली अन्न सुरक्षा अधिकाऱ्याची २ लाखांची फसवणूक करण्यात आली. बेलतरोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला असून, पोलिसांनी सायबर गुन्हेगाराविरोधात गुन्हा नोंदविला आहे.
प्रवीण उमप हे चंद्रपूर येथे अन्न व औषधी प्रशासन विभागात कार्यरत आहेत. त्यांचे कुटुंबीय श्रीरामनगर येथे वास्तव्यास आहे. त्यांना एका अज्ञात मोबाइल क्रमांकावरून एसएमएस आला व वीजबिल अपडेट नसल्याने वीज जोडणी कापण्यात येईल, असे त्यात नमूद होते. उमप यांनी त्या क्रमांकावर वीज देयक भरल्याची पावती पाठविली. रोख रक्कम भरल्याने वीज देयक अपडेट झालेले नसल्याचे कारण देत अज्ञात आरोपीने त्यांना ‘टीमव्हिवर’ हे मोबाइल ॲप डाऊनलोड करण्यास सांगितले. आरोपीने आयडी व माहिती घेऊन त्यांना ऑनलाइन बिल भरण्यास सांगितले. त्याच्या सांगण्यावरून उमप यांनी बिल भरले असता काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून २ लाख १४ हजारांची रक्कम वळती झाली. उमप यांच्या तक्रारीवरून बेलतरोडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.