३० दिवसांत 'वंदे भारत ट्रेन'मधून २ लाख प्रवाशांची सफर; सर्वाधिक प्रवासी सोलापूर-मुंबई मार्गावर

By नरेश डोंगरे | Published: December 4, 2023 04:25 PM2023-12-04T16:25:52+5:302023-12-04T16:26:06+5:30

विविध मार्गावर वंदे भारतला चांगला प्रतिसाद

2 lakh passengers travel by 'Vande Bharat Train' in 30 days; Most passengers on Solapur-Mumbai route | ३० दिवसांत 'वंदे भारत ट्रेन'मधून २ लाख प्रवाशांची सफर; सर्वाधिक प्रवासी सोलापूर-मुंबई मार्गावर

३० दिवसांत 'वंदे भारत ट्रेन'मधून २ लाख प्रवाशांची सफर; सर्वाधिक प्रवासी सोलापूर-मुंबई मार्गावर

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: भारतातील एक आलिशान सुपर फास्ट ट्रेन मधून ओळखल्या जाणाऱ्या वंदे भारत ट्रेन मध्ये नोव्हेंबर महिन्याच्या अवघ्या ३० दिवसांत १ लाख, ९४ हजार, ९०२ प्रवाशांनी सफर केली आहे. मध्य रेल्वे तर्फे विविध मार्गावर १० वंदे भारत चालविल्या जातात, हे उल्लेखनीय!

जलदगती, पॉश आणि अनेक सोयी-सुविधांनी परिपूर्ण असलेल्या वंदे भारत ट्रेनला दिवसेंदिवस प्रवासी चांगला प्रतिसाद देत आहेत. अन्य रेल्वे गाड्यांच्या तुलनेत या गाडीचे प्रवास भाडे जास्त असले तरी ते स्विकारत प्रवाशी या ट्रेनमधून प्रवास करण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. १ ते ३० नोव्हेंबर या ३० दिवसांच्या प्रवाशांच्या संख्येची माहिती मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुढे आली आहे. त्यानुसार, सर्वाधिक ३२८५४ प्रवाशांनी २२२२६ सोलापूर - सीएसएमटी, मुंबई वंदे भारत एक्सप्रेस मधून प्रवास केल्याचे पुढे आले आहे. प्रवाशांची ही टक्केवारी ११६.५४ टक्के आहे. त्या पाठोपाठ याच मार्गावर २२२२५ सीएसएमटी मुंबई - सोलापूर मार्गावर ३०४८७ (१०७.९३ टक्के) प्रवाशांनी प्रवास केला आहे. २२२२४ साईनगर शिर्डी - सीएसएमटी मुंबई वंदे भारत मध्ये ८६.७२ टक्के अर्थात २३४३१ प्रवाशांनी तर २२२२३ शिर्डी - सीएसएमटी वंदे भारतमध्ये २५४३४ (८६.७२ टक्के) प्रवाशांनी प्रवास केला आहे.

२०८२६ नागपूर बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसमध्ये १४७३३ (१०६.९१ टक्के) प्रवाशांनी तर २०८२५ बिलासपूर - नागपूर एक्सप्रेसमध्ये १५३१५ (१११.१३ टक्के) प्रवाशांनी प्रवास केला आहे. मुंबई गोवा (मडगाव) मार्गावर धावणाऱ्या २२२२९ वंदे भारतमध्ये १४०८४ (१०२.२० टक्के) तर , २२२३० गोवा सीएसएमटी मुंबई ट्रेनमध्ये १४०७१ (१०२.११ टक्के) प्रवाशांनी प्रवास केला आहे.

महाकाल दरबारात जाण्यासाठी भाविकांची सोय

नुकतीच सुरू झालेल्या २०९१२ नागपूर इंदूर वंदे भारत एक्सप्रेसलाही प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नोव्हेंबर महिन्यात या ट्रेनमध्ये १२१०० (८७.८० टक्के) आणि २०९११ इंदूर - नागपूर ट्रेनमध्ये १२३९३ अर्थात ८९.९३ टक्के प्रवाशांनी प्रवास केला आहे. या ट्रेनमुळे कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या देवाधिदेव महादेव यांच्या उज्जैन येथील महाकाल मंदीरात जाण्याची भाविकांची चांगली सोय झाली आहे.

Web Title: 2 lakh passengers travel by 'Vande Bharat Train' in 30 days; Most passengers on Solapur-Mumbai route

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.