पोहण्याचा मोह जिवावर बेतला, शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: April 14, 2023 12:21 PM2023-04-14T12:21:29+5:302023-04-14T12:23:21+5:30

सिल्ली शिवारातील घटना

2 school Students drowned to death in the pond at silli shivara of nagpur | पोहण्याचा मोह जिवावर बेतला, शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

पोहण्याचा मोह जिवावर बेतला, शाळकरी विद्यार्थ्यांचा तलावात बुडून मृत्यू

googlenewsNext

मांढळ (नागपूर) : मित्र असलेले दाेन शाळकरी विद्यार्थी पाेहण्यासाठी तलावात गेले आणि बुडाले. ही घटना कुही पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील सिल्ली शिवारात गुरुवारी (दि. १३) दुपारी घडली असून, सायंकाळी उघडकीस आली. दाेघांचेही मृतदेह रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास तलावातून बाहेर काढण्यात आले.

लावण्य ज्ञानेश्वर जीभकाटे (वय १३) व साहील श्रीराम जीभकाटे (१५, दाेघेही रा. सिल्ली, ता. कुही) अशी मृतांची नावे आहेत. लावण्य हा कुही शहरातील रुख्खडाश्रम पब्लिक स्कूलमध्ये इयत्ता सातवीत, तर साहील सिल्ली येथील स्व. संतोषराव रडके हायस्कूलमध्ये इयत्ता नववीत शिकायचा. एकाच गावचे असल्याने दाेघेही मित्र हाेते. लावण्यच्या शाळेला सुट्या लागल्या असून, साहीलची सकाळची शाळा असल्याने दाेघेही गुरुवारी दुपारी सायकलने सिल्ली शिवारात तलावाकडे फिरायला गेले हाेते.

हा तलाव गावापासून अंदाजे अर्धा किमी अंतरावर आहे. त्यांनी सायकली तलावाच्या काठी उभ्या केल्या आणि तलावात पाेहायला सुरुवात केली. खाेल पाण्यात गेल्याने दाेघेही बुडाले. परिसरात कुणीही नसल्याने हा प्रकार कुणाच्याही निदर्शनास आला नाही. सायंकाळी नागरिकांना तलावाच्या काठी दाेन सायकली आणि कपडे आढळून आल्याने त्यांना शंका आली. त्यामुळे त्यांनी लगेच कुही पाेलिसांना सूचना दिली. रात्री ७ वाजण्याच्या सुमारास पाेलिसांनी घटनास्थळ गाठून दाेघांचाही पाण्यात शाेध घ्यायला सुरुवात केली. रात्री ८.४५ वाजण्याच्या सुमारास दाेघांचेही मृतदेह शाेधून काढण्यात पाेलिसांना यश आले. याप्रकरणी कुही पाेलिसांनी अकस्मात मृत्यूची नाेंद करून तपास सुरू केला आहे.

साहील एकुलता मुलगा

लावण्यचे वडील मध्य प्रदेशात नाेकरी करीत असून, आई शेतात कामाला गेली हाेती. त्याला आणखी एक लहान भाऊ आहे. ताे इयत्ता चाैथीत शिकताे. साहील हा आई-वडिलांना एकुलता हाेता. त्याचे आईवडील शेतकरी आहेत. दाेघेही ज्या तलावात पाेहायला उतरले हाेते, त्यात माेठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. गाळात फसल्याने त्यांना बाहेर निघणे शक्य झाले नाही.

Web Title: 2 school Students drowned to death in the pond at silli shivara of nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.