सात घरफोड्या करणाऱ्या दोघांना ठोकल्या बेड्या, २३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त
By दयानंद पाईकराव | Published: May 26, 2023 05:54 PM2023-05-26T17:54:32+5:302023-05-26T17:56:54+5:30
हुडकेश्वर पोलिसांची कामगिरी
नागपूर : हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या परिसरात सात घरफोड्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी गजाआड करून त्यांच्याकडून २३ लाख ७० हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
शुभम उर्फमुन्नी चंद्रशेखर मुन (वय २५, रा. सोमवारी क्वार्टर, तुकडोजी पुतळ्याजवळ) आणि राकेश उर्फढोक सुनिल लखोटे (वय ३४, रा. शताब्दीनगर, रामेश्वरी रिंग रोड) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. ४ मे रोजी रात्री ९ वाजता सुर्याेदयनगर, रेवती अपुर्वा सोसायटी हुडकेश्वर रोड येथील रहिवासी सुरेंद्र बळीराम कोहाड (वय ६३) हे शेजारी राहणाºया मुलाच्या रिसेप्शनला गेले असताना आरोपींनी त्यांच्या घरातून रोख ४५ हजारासह सोन्याचांदीचे दागीने असा १७ लाखाचा मुद्देमाल चोरुन नेला होता.
या प्रकरणी गुन्हा दाखल केल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून व तांत्रिक तपासातून दोन्ही आरोपींना अटक करून त्यांची पोलिस कोठडी मिळविण्यात आली. पोलिस कोठडीत आरोपींनी हुडकेश्वर पोलिस ठाण्याच्या हद्दीत सात ठिकाणी घरफोड्या केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्याकडून २३ लाख ७० हजार २८५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कामगिरी वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत, निरीक्षक विक्रांत सगणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रशांत राऊत, प्रमोद खंडार, शैलेश ठवरे, नृसिंह दमाहे, राजेश मोते, राजेश धोपटे, आशिष तितरमारे, गणेश बोंदरे, चंद्रशेखर कौरती, मुकेश कन्हाके, पवनकुमार लांबट, प्रदिप भदाडे, दिपक तऱ्हेकर, वंदना काकडे यांनी केली.