‘आपली बस’च्या डेपोत घुसून २० बसच्या काचा फोडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 11:44 PM2019-03-19T23:44:40+5:302019-03-19T23:45:32+5:30

धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमलगतच्या पटवर्धन ग्राऊं ड येथील आपली बसच्या डेपोत रविवारी रात्री १० च्या सुमारास सशस्त्र अज्ञात १०-१२ गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी घुसून २० बसच्या काचा फोडल्या तसेच सुरक्षा रक्षकाला काठीने जबर मारहाण केली. जो दिसेल त्याला मारहाण करून दहशत निर्माण केली. यामुळे घाबरलेला सुरक्षा रक्षक व कार्यरत सुपरवायझर जीवाच्या भीतीने पळून गेले.

20 bus crashes broke out after entering the bus depot | ‘आपली बस’च्या डेपोत घुसून २० बसच्या काचा फोडल्या

‘आपली बस’च्या डेपोत घुसून २० बसच्या काचा फोडल्या

googlenewsNext
ठळक मुद्देपोलिसात तक्रार : सशस्त्र आरोपींची सुरक्षा रक्षकाला मारहाण

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धंतोली परिसरातील यशवंत स्टेडियमलगतच्या पटवर्धन ग्राऊं ड येथील आपली बसच्या डेपोत रविवारी रात्री १० च्या सुमारास सशस्त्र अज्ञात १०-१२ गुंड प्रवृत्तीच्या युवकांनी घुसून २० बसच्या काचा फोडल्या तसेच सुरक्षा रक्षकाला काठीने जबर मारहाण केली. जो दिसेल त्याला मारहाण करून दहशत निर्माण केली. यामुळे घाबरलेला सुरक्षा रक्षक व कार्यरत सुपरवायझर जीवाच्या भीतीने पळून गेले.
यासंदर्भात धंतोली पोलिसात तक्रार करण्यात आली. परंतु या घटनेतील आरोपींना अटक झाली की नाही, याची माहिती पुढे आली नाही. यासंदर्भात महापालिका प्रशासनालाही माहिती देण्यात आली. यासंदर्भात महापालिका प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार रात्री ९ वाजताच्या सुमारास एक चालक ड्युटी संपल्याने बस डेपोत जमा करण्यासाठी धंतोली येथील भाजपा कार्यालयाकडून डावीकडे वळत असताना रस्त्यावरील विजेचा वायर बसच्या छताला अडक ल्याने तुटला. तो एका कारवर व इतर वाहनांवर पडला. यामुळे बस चालकासोबत काही लोकांचा वाद झाला. काही युवक मारायला धावल्याने चालक बस सोडून डेपोत पळून गेला. त्यानंतर १०-१२ युवक हातात काठ्या घेऊ न आले. दगडफेक करीत डेपोत घुसले. त्यांनी डेपोतील बसच्या काचांची तोडफोड केली. यासंदर्भात मे.आर.के.सिटी बस ऑपरेटर नीलमणी गुप्ता यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या घटनेला दुजोरा दिला.
दरम्यान आरोपींनी पळून जाताता डेपोजवळ उभ्या असलेल्या एमएच/३१/सीएन/३५०३ क्रमांकाच्या कारच्या समोरच्या व मागच्या काचा फोडल्या.
आरोपींनी काचा फोडलेल्या बसेस
बस क्रमांक एमएच/३१/सीए/६१५१, एमएच/३१/एफसी/९९०, एमएच/३१/सीए/६२४१, एमएच/३१/सी/६१५४, एमएच/३१/एफसी/ ९३९, एमएच/३१/एफसी/३८९,एमएच/३१/एफसी/९७०,एमएच/३१/एफसी/९४१,एमएच/३१/एफसी/९७१,एमएच/३१/एफसी/९४५, एमएच/३१/एफसी/९४२, एमएच/३१/एफसी/५०९, एमएच/३१/एफसी/९४६ आदी बसेसच्या समोरील काचा फोडण्यात आल्या. तर एमएच/३१/एफसी/९४०, एमएच/३१/एफसी/९४७, एमएच/३१/एफसी/३७७, एमएच/३१/सीए/६१६३, एमएच/३१/सीए/६१३७, एमएच/३१/सीए/६१४०, एमएच/३१/सीए/६१६० या गाड्यांच्या मागील बाजूच्या काचा फोडल्या.

Web Title: 20 bus crashes broke out after entering the bus depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.