बापरे! दोन दिवसात २० मृत्यू, ७,०९६रुग्णांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2022 11:12 AM2022-01-28T11:12:15+5:302022-01-28T11:22:09+5:30
२७ जानेवारी रोजी चाचण्यांच्या संख्येत घट आली. ७,६७९ चाचण्यांमधून शहरात २०२७, ग्रामीणमध्ये ७५५ तर जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, शहरात १० तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचे बळी गेले.
नागपूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत गुरुवारी सर्वाधिक १४ मृत्यूची नोंद झाली. बुधवारीही ६ मृत्यू झाल्याने दोन दिवसात मृतांचा आकडा २० वर पोहचला. तर या दोन दिवसात ७,०९६ नव्या रुग्णांची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या ५,५०,१६० तर मृतांची संख्या १०,२०३ झाली.
नागपूर जिल्ह्यात बुधवार, २६ जानेवारी रोजी ११,५०९ चाचण्या झाल्या. यात शहरातील २,९२८ ग्रामीणमधील १,१७६ तर जिल्ह्याबाहेरील १२१ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, शहरात ५ तर जिल्ह्याबाहेरील १ असे ६ रुग्णाचे मृत्यू झाले. गुरुवार, २७ जानेवारी रोजी चाचण्यांच्या संख्येत घट आली. ७,६७९ चाचण्यांमधून शहरात २०२७, ग्रामीणमध्ये ७५५ तर जिल्ह्याबाहेरील ८९ रुग्ण पॉझिटिव्ह आले. शिवाय, शहरात १० तर जिल्ह्याबाहेरील ४ रुग्णांचे बळी गेले. मागील दोन दिवसात ग्रामीणमध्ये एकही मृत्यू नाही. परंतु शहरात १५ तर जिल्ह्याबाहेरील ५ रुग्णांचे बळी गेले. मृतांची वाढती संख्या आरोग्य यंत्रणेसाठी चिंतेचे कारण ठरले आहे.
कोरोनाच्या मृतांमध्ये ४ महिन्यांची मुलगी
मागील दोन दिवसांतील मृत्यूंमध्ये ४ महिन्यांचा मुलीचाही समावेश आहे. वर्धा येथील रहिवासी असलेल्या या चिमुकलीचा आरटीपीसीआरचा रिपोर्ट २४ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आला. त्याच दिवशी तिला नागपूर मेडिकलमध्ये भरती करण्यात आले. २७ जानेवारी रोजी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. डॉक्टरांनुसार तिला एन्सेफलायटीस व गंभीर स्वरूपातील ॲनिमिया झाला होता.
-११ जानेवारीनंतर मृत्यूत वाढ
१ ते १० जानेवारीपर्यंत एकाही मृत्यूची नोद नव्हती. परंतु ११ व १३ जानेवारी रोजी प्रत्येकी १, १४ जानेवारी रोजी ३, १५ जानेवारी रोजी १, १६ जानेवारी रोजी ३, १७ जानेवारी रोजी ४, १९ जानेवारी रोजी ५, २० जानेवारी रोजी ६, २१जानेवारी रोजी ७, २२ जानेवारी रोजी ८, २३ जानेवारी रोजी ९, २४, २५ व २६ जानेवारी रोजी प्रत्येकी ६ तर, २७ जानेवारी रोजी १४ रुग्णांचे बळी गेले.
-कोरोनाचे २८,४०२ ॲक्टिव्ह रुग्ण
कोरोनाच्या ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. गुरुवारी या रुग्णांची संख्या २८,४०२ वर पोहचली. यात शहरातील २१,३६९, ग्रामीणमधील ६,९१८ तर जिल्ह्याबाहेरील ११५ रुग्ण आहेत.
-१७ दिवसात ८० रुग्ण
तारीख : शहर : ग्रामीण : जिल्ह्याबाहेरील
११ जानेवारी : ०१ :००:००
१३ जानेवारी : ०१:००:००
१४ जानेवारी : ०२ : ००: ०१
१५ जानेवारी : ००:००:०१
१६ जानेवारी : ०३ :००:००
१७ जानेवारी ०३: ००:०१
१९ जानेवारी : ०४ :००:०१
२० जानेवारी : ०३:०२: ०१
२१ जानेवारी : ०७ :००:००
२२ जानेवारी : ०५ :०१:०२
२३ जानेवारी : ०७ :००:०२
२४ जानेवारी : ०६ :००:००
२५ जानेवारी : ०५ :०१ :००
२६ जानेवारी : ०५ :००:०१
२७ जानेवारी : १० :००:०४