चाचण्यांवर रोज २० लाखांवर खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:07 AM2021-04-03T04:07:19+5:302021-04-03T04:07:19+5:30

नागपूर : कोरोना रुग्णवाढीची साखळी तोडण्यासाठी नागपूर जिल्ह्यात चाचण्यांची संख्या १० हजारांवरून १६ ते १७ हजारांवर गेली आहे. नागपूर ...

20 lakh per day on tests | चाचण्यांवर रोज २० लाखांवर खर्च

चाचण्यांवर रोज २० लाखांवर खर्च

Next

नागपूर : कोरोना रुग्णवाढीची साखळी तोडण्यासाठी नागपूर जिल्ह्यात चाचण्यांची संख्या १० हजारांवरून १६ ते १७ हजारांवर गेली आहे. नागपूर शहरात ६४ चाचणी सेंटर आहेत. उपलब्ध माहितीनुसार, एका रॅपिड ॲन्टिजेन चाचणीसाठी ५४७ रुपये, तर आरटीपीसीआर चाचणीसाठी १४ रुपये खर्च येतो. सध्या आपल्याकडे जवळपास १३,००० ते १४,००० आरटीपीसीआर, तर ३,००० ते ४,००० ॲन्टिजेन चाचणी होतात. याचा रोजचा खर्च सरासरी २० लाखांवर जात आहे. हा खर्च शासकीय निधीतून महापालिका व जिल्हा प्रशासनातर्फे भागवला जात आहे.

नागपूर जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोनाबाधितांची संख्या वाढायला लागली. त्यापूर्वी ३,००० ते ५,००० घरांत रोज चाचण्या व्हायच्या. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून दैनंदिन रुग्णसंख्येत हजार रुग्णांची भर पडत गेल्याने चाचण्यांची संख्या वाढवून ११,००० वर नेण्यात आली. वाढत्या रुग्णसंख्येनुसार दुसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात ही संख्या आणखी वाढवून १५,००० ते १६,०००, तर आता १६,००० ते १७,००० चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाबाधितांच्या प्रमाणावर नियंत्रण मिळविण्यासाठी कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविणे हाच पर्याय असल्याचे मानले जात असल्याने चाचण्यांची व केंद्रांची संख्या वाढविण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

- ॲन्टिजेन चाचणीवरील खर्च मोठा

शहराच्या तुलनेत ग्रामीण भागात रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या अधिक होतात. सध्या रोज तीन हजारांवर चाचण्या होत असल्याने यावरील खर्चही मोठा आहे. १ एप्रिल रोजी नागपूर जिल्ह्यात १७,८७८ चाचण्या झाल्या. यात शहरात १०,९३४, तर ग्रामीणमध्ये २,९९६ अशा एकूण १३,९३० आरटीपीसीआर चाचण्या झाल्या. याचा खर्च १४ रुपयांनुसार १,९५,०२० रुपये आला. याशिवाय, शहरात ७३०, तर ग्रामीणमध्ये ३,२१८ अशा एकूण ३,९४८ रॅपिड ॲन्टिजेन चाचण्या झाल्या. प्रति चाचणी खर्च ५४७ नुसार २१,५९,५५६ रुपये आला.

- लक्षणे दिसताच चाचण्या करा

आरटीपीसीआरच्या एका चाचणीचा खर्च सुमारे १४ रुपये, तर ॲन्टिजेन चाचणीचा खर्च साधारण ५४७ रुपये एवढा येतो. यामुळे कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक प्रतिबंधक उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ज्यांना लक्षणे आहेत त्यांनी तातडीने केंद्रावर जाऊन चाचणी करावी. मनपाच्या व शासकीय रुग्णालयात या चाचण्या नि:शुल्क आहेत.

- डॉ. संजय चिलकर

आरोग्य अधिकारी, महानगरपालिका

:: १ एप्रिल रोजी आरटीपीसीआर चाचणी

शासकीय प्रयोगशाळांमधील चाचण्या : ६,०९३

खासगी प्रयोगशाळांमधील चाचण्या : ७,८३७

खासगी प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह - १,२५९

शासकीय प्रयोगशाळेत पॉझिटिव्ह - २,१८०

Web Title: 20 lakh per day on tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.