२० लाख नवीन वीज मीटर्स उपलब्ध होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:07 AM2021-03-22T04:07:01+5:302021-03-22T04:07:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज मीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८ ...

20 lakh new electricity meters will be available | २० लाख नवीन वीज मीटर्स उपलब्ध होणार

२० लाख नवीन वीज मीटर्स उपलब्ध होणार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वीज मीटरचा निर्माण झालेला तुटवडा दूर करण्यासाठी महावितरणने निविदाअंतर्गत पुरवठादारांना १८ लाख सिंगलफेज, तर १ लाख ७० हजार थ्रीफेज नवीन वीज मीटर्स पुरवठ्याच्या दिलेल्या कार्यादेशान्वये १ लाख ४४ हजार ९०४ वीज मीटर्स महावितरणकडे उपलब्ध झाले असून मार्चअखेरपर्यंत ३ लाख ८० हजार वीज मीटर्सचा पुरवठा होणार आहे.

सद्यस्थितीत महावितरणच्या पुणे प्रादेशिक कार्यालयाकडे ३८,७०४, कोकण प्रादेशिक कार्यालयाकडे ६९,७००, नागपूर प्रादेशिक कार्यालयाकडे २० हजार, तर औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयाकडे १६,५०० या प्रमाणात वीज मीटर्स उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

महावितरणला दररोज सुमारे ८ ते १० हजार नवीन वीज मीटर्सचा पुरवठा सुरू झाला असून मार्चअखेर सिंगल फेजची ३ लाख २० हजार आणि थ्रीफेजची ६० हजार नवीन मीटर्स उपलब्ध होणार आहेत. तसेच एप्रिल ते ऑगस्ट २०२१ पर्यंत सिंगल व थ्री फेजची तब्बल १४ लाख ६० हजार नवीन वीज मीटर्स उपलब्ध होणार आहेत. महावितरणच्या क्षेत्रीय कार्यालयांमध्ये सध्या सिंगल फेजची २ लाख ४१ हजार ८८२, तर थ्रीफेजची २८ हजार ३८६ नवीन वीजमीटर्स उपलब्ध असून वीज मीटरचा कोणताही तुटवडा भासणार नाही.

चौकट

महावितरणतर्फे दरवर्षी ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या

महावितरणकडून दरवर्षी सुमारे ८ ते ९ लाख नवीन वीजजोडण्या कार्यान्वित करण्यात येतात. मार्च २०२० नंतर कोरोना प्रादुर्भाव व लॉकडाऊनमुळे नवीन वीज मीटरची उपलब्धता काही प्रमाणात कमी झाली होती. तरीही जून २०२० नंतर महावितरणतर्फे ६ लाख ५० हजार ५२३ सिंगलफेज, तर ६२ हजार ५५ थ्री फेज ग्राहकांना वीजजोडण्या देण्यात आलेल्या आहेत. मीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेली वीजमीटर्स तातडीने ग्राहकांपर्यंत पोहोचविण्याचे निर्देश मुख्य कार्यालयाकडून निर्गमित करण्यात आलेले आहेत.

Web Title: 20 lakh new electricity meters will be available

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.