२० लाख हडपले, सदनिका दिलीच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:06 AM2021-07-12T04:06:45+5:302021-07-12T04:06:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर - सदनिकेचा साैदा करून २५ पैकी २० लाख घेतल्यानंतर खरेदीदाराची दोघांनी फसवणूक केली. हुडकेश्वर पोलीस ...

20 lakh was seized, flat was not given | २० लाख हडपले, सदनिका दिलीच नाही

२० लाख हडपले, सदनिका दिलीच नाही

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सदनिकेचा साैदा करून २५ पैकी २० लाख घेतल्यानंतर खरेदीदाराची दोघांनी फसवणूक केली. हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. तीन वर्षे होऊनही आरोपींची टाळाटाळ सुरूच असल्याने पीडित व्यक्तीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. त्यावरून पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

महेश वसंतराव कुल्लर (वय ४२) असे तक्रारदाराचे नाव आहे. ते हुडकेश्वरच्या महालक्ष्मीनगरात राहतात. त्यांनी १ जून २०१८ ला आरोपी संदीप सुरेश वाघमारे आणि स्मिता सुरेश वाघमारे यांच्यासोबत सर्वनगर दिघोरी येथील एका सदनिकेचा २५ लाखांत साैदा केला होता. करारनाम्यानुसार कुल्लर यांनी संदीप आणि स्मिताला २० लाख रुपये दिले. एवढी रक्कम घेऊनही आरोपीनी कुल्लर यांना सदनिकेचा ताबा दिला नाही. प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगून ते टाळाटाळ करीत असल्याचे पाहून शेवटी कुल्लर यांनी हुडकेश्वर पोलिसांनी संदीप आणि स्मिता वाघमारे यांच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला. आरोपीची चाैकशी सुरू आहे.

---

Web Title: 20 lakh was seized, flat was not given

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.