सलग तिसऱ्या दिवशी २० नवे बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:07 AM2021-07-10T04:07:21+5:302021-07-10T04:07:21+5:30

नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील प्रभाव कमी झाला असल्याचे दिसून येत असून सलग तिसऱ्या दिवशी २० नवे बाधित आढळले ...

20 new disruptions for third day in a row | सलग तिसऱ्या दिवशी २० नवे बाधित

सलग तिसऱ्या दिवशी २० नवे बाधित

Next

नागपूर : कोरोनाचा दुसऱ्या लाटेतील प्रभाव कमी झाला असल्याचे दिसून येत असून सलग तिसऱ्या दिवशी २० नवे बाधित आढळले तर एका मृत्यूची नोंद झाली. जिल्ह्यातील मृत्यूची संख्या ९ हजार ३२ वर पोहोचली आहे.

शुक्रवारच्या अहवालानुसार नागपूर जिल्ह्यात ५ हजार ५२१ कोरोना संशयितांच्या तपासण्या झाल्या. शहरात ४ हजार ६३८ तर ग्रामीणमध्ये ८८३ तपासण्या झाल्या. शहरात ११ तर ग्रामीणमध्ये ९ नवे बाधित आढळले व शहरात एका रुग्णाचा मृत्यू झाला.

आतापर्यंत जिल्ह्यात ४ लाख ७७ हजार २९० बाधित आढळले आहेत. त्यातील ३ लाख ३२ हजार ६६९ बाधित नागपूर शहरातील तर १ लाख ४३ हजार १२ बाधित जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यातील मृत्यूचा आकडा ९ हजार ३२ वर गेला. तर ४ लाख ६८ हजार १०३ लोकांनी कोरोनावर मात केली.

१५५ पैकी ११७ रुग्ण रुग्णालयात

सद्यस्थितीत जिल्ह्यामध्ये १५५ सक्रिय रुग्ण आहेत. त्यात शहरातील १४१ व ग्रामीणमधील १४ रुग्णांचा समावेश आहे. यापैकी ११७ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत असून ३८ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.

कोरोनाची शुक्रवारची स्थिती...

दैनिक चाचण्या : ५,५२१

शहर : ११ रुग्ण व १ मृत्यू

ग्रामीण : ९ रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण : ४,७७,२९०

एकूण सक्रिय रुग्ण : १५५

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,६८,१०३

एकूण मृत्यू : ९,०३२

Web Title: 20 new disruptions for third day in a row

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.