रिपाइंला हव्या २० जागा

By admin | Published: July 30, 2014 01:12 AM2014-07-30T01:12:33+5:302014-07-30T01:12:33+5:30

महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत रिपाइंने ५७ जागांची यादी दिली होती. यातील ३०-३५ जागा मिळाव्या असा आग्रह होता. परंतु त्यानुसार जागा मिळण्याची शक्यता नसल्याने किमान २० जागा मिळाव्या

20 seats for the Republican | रिपाइंला हव्या २० जागा

रिपाइंला हव्या २० जागा

Next

रामदास आठवले : विदर्भातील १३ जागांचा समावेश
नागपूर : महायुतीच्या जागा वाटपाच्या बैठकीत रिपाइंने ५७ जागांची यादी दिली होती. यातील ३०-३५ जागा मिळाव्या असा आग्रह होता. परंतु त्यानुसार जागा मिळण्याची शक्यता नसल्याने किमान २० जागा मिळाव्या, अशी मागणी रिपाइंचे नेते खासदार रामदास आठवले यांनी मंगळवारी रविभवन येथे पत्रपरिषदेत केली.
विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महायुतीने जागा वाटपाचा निर्णय तातडीने घ्यावा. पडणाऱ्या जागा न देता निवडून येतील अशाच जागा आम्हाला द्याव्या. विदर्भातील १३ जागांवर रिपाइंने दावा केला आहे. यात उत्तर नागपूर, राजुरा, चिमूर, वर्धा, मोर्शी, अर्जुनी मोरगाव, तिवसा, बडनेरा, उमरखेड, राळेगाव, बाळापूर, मेहकर व वाशिम आदी जागांचा समावेश आहे. आम्हाला डावलले तर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार येणार नाही. रिसोड मतदारसंघातील पोटनिवडणुकीतून त्यांनी बोध घ्यावा, असा इशारा आठवले यांनी दिला.
लोकसभा निवडणुकीची पुनरावृत्ती विधानसभा निवडणुकीत होईल. भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करणारी काँग्रेसच जातीयवादी असल्याचे आठवले म्हणाले.
विदर्भातील वन विभागाच्या झुडपी जंगलाच्या जमिनीचे वाटप भूमिहीन दलित व आदिवासींना करण्यात यावे.
धनगर समाजाला मराठा व मुस्लीम समाजाच्या धर्तीवर लोकसंख्येच्या आधारावर आरक्षण द्यावे, अशी भूमिका आठवले यांनी मांडली. यावेळी अ.भा.धम्मसेनेचे रवी शेंडे यांनी रिपाइंमध्ये प्रवेश घेतला.
पत्रपरिषदेला भूपेश थूलकर, अनिल गोंडाणे, राजू बहादुरे, मनोज मेश्राम, दीपक बन्सोड, विकास गणवीर, एल.के.मडावी, राजन वाघमारे आदी उपस्थित होते.
कर्नाटक सरकार बरखास्त करावे
सीमा भागातील मराठी बांधवांना पोलिसांनी अमानुषपणे मारहाण केली.
हा प्रकार दुर्दैवी आहे. मराठी व कन्नड वाद वाढविण्याचा प्रयत्न होत असल्याने कर्नाटक सरकार बरखास्त करावे, अशी मागणी आठवले यांनी केली. (प्रतिनिधी)

Web Title: 20 seats for the Republican

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.