हिवाळी अधिवेशनात २० हजार अधिकारी, कर्मचारी असणार नागपुरात मुक्कामी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 02:10 PM2024-12-11T14:10:48+5:302024-12-11T14:11:24+5:30
Nagpur : मंत्र्यांसाठी कॉटेज सज्ज ४० पीएस व ४१९ पी.ए. देखील येणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन एका आठवड्यावर असताना प्रशासनाकडून युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. हिवाळी अधिवेशनासाठी १८ ते २० हजार अधिकारी-कर्मचारी नागपुरात पोहोचणार आहेत. त्यांच्या निवासाची व्यवस्था निवासी इमारती, शासकीय गेस्ट हाऊस, लॉन व वसतिगृहांमध्ये करण्यात येत आहे.
मोर्चात येणाऱ्यांसाठी सद्भावना
लॉन हिवाळी अधिवेशनात मोर्चात येणाऱ्यांसाठी जाफरनगर येथील सद्भावना लॉनही ताब्यात घेण्यात आले आहे. सुमारे दोन हजार लोकांसाठी येथे व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दाभा येथे पाच हजार लोकांसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.
गेस्ट हाऊस, लॉन, होस्टेलमध्ये निवास व्यवस्था
- दरम्यान, पीडब्ल्यूडीने शहरातील अनेक गेस्ट हाऊस निवासव्यवस्थेसाठी ताब्यात घेतली आहेत. यामध्ये डब्ल्यूईसी, कृषी कुंज, विद्युत विभाग, पाटबंधारे विभाग, नौरी, जीवन प्राधिकरण आणि व्हीएनआयटीचे अतिथिगृह यांचाही समावेश आहे.
- १६० गाळ्यांच्या संकुलासह सरपंच भवन, शासकीय दूध कॉलनी, आकार कॉलनी, पोलिस लाईन टाकळी क्वार्टर, रविनगर कॉलनी येथेही राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.
- वाहनचालकांची निवास व्यवस्था होमगार्ड आणि पोलिस प्रशिक्षण केंद्रात असेल, तसेच मॉरिस कॉलेजचे वसतिगृह आणि आय. ए. एस. प्रशिक्षण केंद्रही ताब्यात घेण्यात आले आहे.
कुणाचे किती कर्मचारी येणार
पद पीएस पीए कार्यालयीन कर्मचारी इतर कर्मचारी
राज्यपाल २ ३ २० १०
मुख्यमंत्री २ ४ २० १०
उपमुख्यमंत्री २ ४ २० १०
उपमुख्यमंत्री २ ४ २० १०
अध्यक्ष १ २ १० १०
उपाध्यक्ष १ २ १० १०
सभापती १ २ १० १०
उपसभापती १ २ १० १०
विरोधी पक्षनेता १ २ ४ १०
विरोधी पक्षनेता १ २ ४ १०
आमदार (वि. स.) ०० २८८ ४ ५६०
आमदार (वि. प.) ०० ७८ ७८ १३२
मंत्री २६ २६ २६ १००