२० तरुणांनी उभारला स्वत:चा व्यवसाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:07 AM2021-07-27T04:07:49+5:302021-07-27T04:07:49+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागपूर विभागातील २० नव उद्योजकांनी केंद्र शासनाच्या बहुचर्चित स्टॅन्ड अप इंडिया या योजनेचा ला. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर विभागातील २० नव उद्योजकांनी केंद्र शासनाच्या बहुचर्चित स्टॅन्ड अप इंडिया या योजनेचा ला. घेत स्वत:चा व्यवसाय उभारला. यात नागपुरातील सर्वाधिक १७ नवउद्योजकांसह चंद्रपूरमधील २ व गडचिरोली जिल्ह्यातील एका नवउद्योजकाचाही समावेश आहे.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे १२५ वे जयंतीवर्ष केंद्र सरकार आणि राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर साजरे केले. त्याचदरम्यान २०१५ मध्ये केंद्र सरकारने स्टॅन्ड अप इंडिया ही योजना घोषित केली. या योजनेचा ला. घेण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजाच्या घटकांकरिता मार्जिन मनी उपलब्ध करून देण्याचा निर्णय सरकारने घेतला. या निर्णयांतर्गत राज्यातील अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील नवउद्योजक लाभार्थ्यांना मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किमतीच्या लाभार्थ्यांच्या हिश्श्यामधील २५ टक्केपैकी जस्तीत जास्त १५ टक्के मार्जिन मनी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थी पात्र नवउद्योजकांनी १० टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टॅन्ड अप इंडिया योजनेंतर्गत ७५ टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एण्ड सबसिडी (१५ टक्के) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून देण्यात येते. नागपूर विभागातील एकट्या नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक १७ नवउद्योजकांनी याचा ला. घेतला.
योजनेंतर्गत २०२०-२१ या आर्थिक वर्षात एकूण ३५ नवउद्योजकांचे प्रस्ताव प्राप्त झाले. त्यापैकी २० प्रस्ताव प्रादेशिक उपायुक्त समाजकल्याण नागपूर कार्यालयाने छाननी करून अर्थसाहाय्य मंजुरीसाठी समाजकल्याण आयुक्त पुणे यांच्याकडे सादर केला. त्यानंतर त्यांनी अर्ज मंजूर केला.
- असे मिळावे अर्थसाहाय्य
नागपुरातील १७ नवउद्योजक अर्जदारांना एकूण १ कोटी २५ लाख ८६ हजार २०० रुपयांचे अर्थसाहाय्य मंजूर करण्यात आले. चंद्रपूरमधील २ अर्जदारांना १३ लाख २०० रुपये तर गडचिरोलीतील एका अर्जदाराला ६ लाख ६९ हजार ५०० रुपयाचे अर्थसाहाय्य मंजूर झाले.