नेदरलँडच्या किस्टोनमॅब कंपनीचा मिहानमध्ये २०० कोटींचा प्रकल्प

By जितेंद्र ढवळे | Published: January 28, 2024 07:41 PM2024-01-28T19:41:23+5:302024-01-28T19:41:38+5:30

एमएडीसीसोबत सामंजस्य करार : सेझमध्ये उभारणार फार्मा युनिट

200 crores project in Meehan by Kistonemab Company of Netherlands | नेदरलँडच्या किस्टोनमॅब कंपनीचा मिहानमध्ये २०० कोटींचा प्रकल्प

नेदरलँडच्या किस्टोनमॅब कंपनीचा मिहानमध्ये २०० कोटींचा प्रकल्प

नागपूर: महाराष्ट्र एअरपोर्ट डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड (एमएडीसी) आणि नेदरलँडची कंपनी किस्टोनमॅब यांच्यामध्ये रविवारी खासदार औद्योगिक महोत्सव – ॲडव्हांटेज विदर्भमध्ये २०० कोटी रुपयांचा प्रकल्प स्थापन करण्याकरिता सामंजस्य करार करण्यात आला.

असोसिएशन फॉर इंडस्ट्रिअल डेव्हलपमेंट (एड) च्या वतीने खासदार औद्योगिक महोत्सव-ॲडव्हांटेज विदर्भचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात आयोजन करण्यात आले आहे. रविवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फार्मास्युटिकल क्षेत्राच्या चर्चासत्रादरम्यान एमएडीसी व नेदरलँडच्या कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. मिहान सेझमध्ये नेदरलँडची किस्टोनमॅब ही कंपनी नावीन्यपूर्ण डोज-फॉर्म सोल्युशन्सचा निर्मिती प्रकल्प स्थापन करणार आहे. याद्वारे ३०० लोकांना प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या रोजगार मिळणार आहे. याशिवाय ३०० कोटींचा वार्षिक महसूलदेखील प्राप्त होणार आहे.

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत किस्टोनमॅबचे सीईओ डॉ. तुषार सातव, सीसीओ डॉ. रोलँड मिजेल व एमएडीसी लिमिटेडचे निवृत्त अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रकाश पाटील यांनी करारावर स्वाक्षरी केली. यावेळी एडचे अध्यक्ष आशिष काळे व सचिव डॉ. विजय शर्मा उपस्थित होते.
फार्माच्या या सत्रात एएमटीझेडचे सीईओ डॉ. जितेंद्र शर्मा, नितिका फार्माचे रवलीन खुराना, झीम लॅबचे डॉ. अनवर दौड, अतुल मंडलेकर, ॲट्रमचे अमित कुमार शर्मा, आलोक सिंग, आदी मान्यवरांनी सहभाग नोंदवला.

Web Title: 200 crores project in Meehan by Kistonemab Company of Netherlands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर