पेट्रोल पंपांवर सुरू आहे २ हजाराच्या नोटेचे चलन, पंपावरील डिलिव्हरी बॉयची प्रतिक्रिया

By मोरेश्वर मानापुरे | Published: May 21, 2023 09:55 PM2023-05-21T21:55:05+5:302023-05-21T21:55:33+5:30

खूप दिवसानंतर २ हजाराची दोन नोट बघायला मिळत असल्याची प्रतिक्रिया पंपावरील डिलिव्हरी बॉयने सदर प्रतिनिधीला दिली. 

2000 note currency is going on at petrol pumps, reaction of the delivery boy at the pump | पेट्रोल पंपांवर सुरू आहे २ हजाराच्या नोटेचे चलन, पंपावरील डिलिव्हरी बॉयची प्रतिक्रिया

पेट्रोल पंपांवर सुरू आहे २ हजाराच्या नोटेचे चलन, पंपावरील डिलिव्हरी बॉयची प्रतिक्रिया

googlenewsNext

नागपूर : दोन हजाराची नोट वितरणातून मागे घेण्याच्या भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर काही बाजारपेठांमध्ये व्यापाऱ्यांनी या नोटा घेण्यास नकार दिला, पण हिंदुस्थान पेट्रोलियम, इंडियन आॅईल आणि भारत पेट्रोलियमच्या पेट्रोल पंपावर नोटा स्वीकारत असल्याचे दिसून आले आहे. खूप दिवसानंतर २ हजाराची दोन नोट बघायला मिळत असल्याची प्रतिक्रिया पंपावरील डिलिव्हरी बॉयने सदर प्रतिनिधीला दिली. 

उमरेड रोडवरील रिलायन्सच्या पंपावर २ हजाराची नोट स्वीकारत नसल्याचा आरोप काही ग्राहकांनी लोकमतशी बोलताना केला. रिझर्व्ह बँकेच्या निर्णयानंतर शनिवारी अनेक पंपावर २ हजाराची नोट स्वीकारणे बंद केले होते, पण रविवारी या सर्वच पंपावर ही नोट स्वीकारत आहे. शनिवारी गुरुदेवनगर, न्यू नंदनवन येथील भारत पेट्रोलियमच्या पंचशील नामक पंपावर २ हजाराची नोट स्वीकारण्याआधी आधार कार्डची झेरॉक्स मागितली. तर याच भागातील श्री गुरुदेव पेट्रोलियम या पंपावर सकाळी २ हजाराची नोट नाकारण्यात आली, मात्र सायंकाळी नोट स्वीकारण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. डिलिव्हरी बॉयने २ हजाराच्या नोटा दाखविल्या. 

सक्करदरा येथील इंडियन आॅईलच्या पंपावर २ हजाराची नोट स्वीकारली जात असल्याचे दिसून आले, तर याच कंपनीच्या वर्धा रोड, पंचशील चौकातील पेट्रोल पंपावर २ हजाराची नोट स्वीकारत नसल्याचे कर्मचाºयांनी सांगितले. तर पुढे काही अंतरावरील हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पंपावर नोट स्वीकारत असल्याचे कर्मचारी म्हणाले. 

पेट्रोलियम कंपन्यांनी स्थिती स्पष्ट करावी
२ हजाराची नोट चलनात सुरू असतानाही काही पेट्रोलियम कंपन्यांच्या पंपचालकांनी नोटेसंदर्भात संभ्रम निर्माण केला आहे. काहींचा होकार तर काहींचा स्वीकारण्यात नकार आहे. सर्व पंपचालकांनी २ हजाराची नोट स्वीकारावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी ग्राहक पंचायतचे पदाधिकारी गजानन पांडे यांनी पेट्रोलियम कंपन्यांकडे केली आहे.

Web Title: 2000 note currency is going on at petrol pumps, reaction of the delivery boy at the pump

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :nagpurनागपूर