महाराष्ट्राच्या २७२ महामार्ग प्रकल्पांसाठी २०४० कोटींची मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 09:36 AM2021-04-23T09:36:35+5:302021-04-23T09:36:56+5:30

Nagpur news सीआरआयएफअंतर्गत (सेंट्रल रोड ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड) महाराष्ट्रातील २७२ रस्ते प्रकल्पांसाठी २०८० कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे.

2040 crore sanctioned for 272 highway projects in Maharashtra | महाराष्ट्राच्या २७२ महामार्ग प्रकल्पांसाठी २०४० कोटींची मंजुरी

महाराष्ट्राच्या २७२ महामार्ग प्रकल्पांसाठी २०४० कोटींची मंजुरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर - सीआरआयएफअंतर्गत (सेंट्रल रोड ॲन्ड इन्फ्रास्ट्रक्चर फंड) महाराष्ट्रातील २७२ रस्ते प्रकल्पांसाठी २०८० कोटी ८० लाख रुपयांच्या निधीची मंजुरी देण्यात आली आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करून ही माहिती दिली. या निधीमुळे अमरावती जिल्ह्यातील अनेक रस्ते प्रकल्पांना वेग मिळण्याची शक्यता आहे.

अमरावती जिल्ह्यातील तळेगाव(ठाकूर)- ब्राह्मणवाडा मार्गावरील नदीवर पुलासाठी ४ कोटी ९३ लाख रुपये मंजूर झाले आहेत. याचप्रकारे अमरावती व बडनेरादरम्यान पूल निर्माण करण्यासाठी ४ कोटी ८६ लाख मंजूर करण्यात आले आहेत. याचप्रकारे धनोरा-नंदसावंगी-वाढोणा मार्गाला मजबूत करण्यासाठी १९ कोटी ५५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. चांदूर बाजार-बेलोरा मार्गासाठी १३ कोटी ९० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे.

याचप्रकारे अहमदनगर व औरंगाबाद येथील प्रकल्पांसाठीदेखील निधीला मंजुरी देण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील खंडोबा देवस्थान मंदिर रिंगरोड व रोपवेसाठी ५६ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे. तेथे हेलिपॅड व विश्रामगृहदेखील बनविण्यात येतील. हे तीर्थक्षेत्र पुणे-नाशिक तसेच पुणे-नगर राष्ट्रीय महामार्गाशी जोडल्या जाईल.

Web Title: 2040 crore sanctioned for 272 highway projects in Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.