विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2022 09:57 AM2022-12-30T09:57:56+5:302022-12-30T09:58:06+5:30

या शिवाय ओबीसी विद्यार्थी कल्याणाच्या इतरही योजना त्यांनी जाहीर केल्या.

21 600 per annum to students said devendra fadnavis | विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस

विद्यार्थ्यांना वर्षाला २१,६०० रुपये देणार: देवेंद्र फडणवीस

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर: वसतिगृहांमध्ये  प्रवेश न मिळालेल्या ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांना भोजन, निवास आणि शैक्षणिक सुविधांसाठी २१ हजार ६०० रुपये वर्षाकाठी दिले जातील आणि ही रक्कम थेट त्यांच्या खात्यात टाकली जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत जाहीर केले. या शिवाय ओबीसी विद्यार्थी कल्याणाच्या इतरही योजना त्यांनी जाहीर केल्या.

 सत्ताधारी व विरोधकांच्या  प्रस्तावाला उत्तर देताना ते म्हणाले की, अडीच वर्षांत ओबीसी विद्यार्थ्यांसाठी एकही वसतिगृह सुरू करण्यास महाविकास आघाडी सरकारला वेळ मिळाला नव्हता. आम्ही सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये ते सुरू करू. त्यासाठीच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. पाच वसतिगृहे लवकरच सुरू केली जातील. ती एनजीओंना चालवायला दिली जातील. पीएचडी करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना सरसकट ३५ हजार रुपयांचे अर्थसाहाय्य सरकार करेल.

ते निर्णय त्यांचेच

ओबीसी कल्याण विभागाच्या ज्या निर्णयावर छगन भुजबळ यांनी आरोप केले ते निर्णय आमच्या काळातील नसून वडेट्टीवार यांच्या काळातील आहेत, असे फडणवीस म्हणाले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: 21 600 per annum to students said devendra fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.