विदर्भात कोरोनाचे २१,४७७ रुग्ण अॅक्टिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2020 10:02 PM2020-10-08T22:02:10+5:302020-10-08T22:03:46+5:30
Active Corona Positive in Vidarbha विदर्भात कोरोनाबाधितांसोबतच मृतांची संख्याही कमी होऊ लागली आहे. गुरुवारी १५३० रुग्ण तर ३८ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,६२,४११ झाली असून मृतांची संख्या ४४०२ वर पोहचली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधितांसोबतच मृतांची संख्याही कमी होऊ लागली आहे. गुरुवारी १५३० रुग्ण तर ३८ मृत्यूंची भर पडली. रुग्णांची एकूण संख्या १,६२,४११ झाली असून मृतांची संख्या ४४०२ वर पोहचली आहे. विशेष म्हणजे, १,३६,५०७ रुग्ण बरे झाले आहेत. सध्याच्या स्थितीत २१,४७७ रुग्ण ‘अॅक्टिव्ह’ आहेत.
नागपूर जिल्ह्यात आज ७४६ रुग्णांचे निदान तर २० रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ८४,८२७ झाली असून २,७२४ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. या जिल्ह्यात ७२,६१४ रुग्ण बरे झाले, तर ९,४८९ रुग्ण अॅक्टिव्ह म्हणजे क्रियाशील आहेत. अमरावती जिल्ह्यात १५१ रुग्ण व पाच रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णांची संख्या १४,५२४ झाली असून मृतांची संख्या ३२४ वर गेली आहे. १२,३३८ रुग्ण बरे झाले आहेत. ६८२ रुग्ण उपचार घेत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात १५१ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. रुग्णसंख्या ११,६२३ झाली आहे तर मृतांची संख्या १८०वर पोहचली आहे. ८,३६९ रुग्ण बरे झाले असून ३,०७४ रुग्ण उपचार घेत आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ११३ रुग्णांची भर पडल्याने रुग्णसंख्या ३,६१८ झाली. जिल्ह्यात २१ मृत्यू, २६७६ कोरोनामुक्त व ९२१ रुग्ण अॅक्टीव्ह आहेत. भंडारा जिल्ह्यात १०७ रुग्ण व तीन रुग्णांचे बळी गेले. ४,८३३ रुग्ण बरे झाले आहेत तर १,४९८उपचाराखाली आहेत. यवतमाळ जिल्ह्यात ५२ रुग्णांची नोंद झाल्याने रुग्णसंख्या ८,९२९ वर गेली आहे. जिल्ह्यात ७९६३ रुग्ण बरे झाले. ७८९ रुग्ण क्रियाशील आहेत. वाशिम जिल्ह्यात २१ रुग्ण व एका रुग्णाचा मृत्यू झाला. ४,१०८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. ६६१ रुग्ण अॅक्टिव्ह आहेत. बुलडाणा जिल्ह्यात ४३ रुग्ण व दोन बळी गेले. ७०५९ रुग्ण बरे झाले आहेत. ७५१ रुग्ण उपचार घेत आहेत. वर्धा जिल्ह्यात ७२ रुग्णांचे निदान व पाच मृत्यू झाले. जिल्ह्यात ३,०८४ रुग्ण बरे झाले असून १९८८ रुग्ण क्रियाशील आहेत. अकोला जिल्ह्यात ३६ पॉझिटिव्ह रुग्णांची व एका मृत्यूची नोंद झाली. ६,६९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ७९७ रुग्ण उपचार घेत आहेत. गोंदिया जिल्ह्यात ३८ बाधित रुग्ण आढळून आले. बरे झालेल्या रुग्णांची संख्या २६७६ झाली आहे. ९२१ अॅक्टिव्ह आहेत.