२,१६७ बाधित तर २,५९८ कोरोनामुक्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:04+5:302021-05-07T04:09:04+5:30
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ रामटेक/ हिंगणा/ मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण बाधित होण्याची टक्केवारी वाढत आहे. मात्र ...
सावनेर/ काटोल/नरखेड/उमरेड/ कळमेश्वर/कुही/ रामटेक/ हिंगणा/ मौदा : नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाबाधित रुग्ण बाधित होण्याची टक्केवारी वाढत आहे. मात्र काही तालुक्यात कोरोनाची साखळी अबाधित असल्याने बाधितांचा ग्राफही वाढतो आहे. जिल्ह्यातील तेरा तालुक्यात बुधवारी मध्यरात्रीच्या अहवालानुसार २१६७ नव्या रुग्णांची भर पडली. २१ रुग्णांचा मृत्यू झाला. ग्रामीण भागात आतापर्यंत २००१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांची संख्या १,२४,५०४ इतकी झाली आहे. यातील ९३,४१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. गुरुवारी ही संख्या २५९८ इतकी होती. सध्या ग्रामीण भागात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या २९,०१६ इतकी आहे.
सावनेर तालुक्यात १४३ रुग्णांची भर पडली. यात सावनेर शहरातील २८ तर ग्रामीणमधील ११५ रुग्णांचा समावेश आहे. चिचोली प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत ३ तर खापा आरोग्य केंद्राअंतर्गत एका रुग्णाचा मृत्यू झाला.
काटोल तालुक्यात १९५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात काटोल शहरातील १४ तर ग्रामीण भागातील ६४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात कचारी सावंगा केंद्राअंतर्गत १९, कोंढाळी केंद्राअंतर्गत २२ तर येनवा केंद्राअंतर्गत २३ रुग्णांची नोंद झाली.
नरखेड तालुक्यात १०० रुग्णांची भर पडली. यात नरखेड शहरातील १६ तर ग्रामीण भागातील ८४ रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १८५५ तसेच शहरात ४०४ इतकी झाली आहे. ग्रामीण भागात प्राथमिक आरोग्य केंद्र सावरगाव अंतर्गत ३०, जलालखेडा प्राथमिक आरोग्य केंद्र (३६), मेंढला प्राथमिक आरोग्य केंद्र (१२) तर मोवाड प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत येणाऱ्या गावात ६ रुग्णांची नोंद झाली.
कुही तालुक्यात विविध केंद्रांवर ३७५ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ४८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. यात कुही येथील (९), मांढळ (१३), वेलतूर (१२), साळवा (४) तर तितूर येथील १० रुग्णांचा समावेश आहे.
कळमेश्वर तालुक्यात ४१ रुग्णांची भर पडली. यात तेलकामठी येथे ६, धापेवाडा (४), आष्टीकला, मोहपा येथे प्रत्येकी ३, खैरी हरजी, लिंगा, तेलगाव, घोगली, मोहगाव, दाढेरा, गोंडखैरी येथे प्रत्येकी दोन रुग्णांची नोंद झाली.
रामटेक तालुक्यात ४७ रुग्णांची नोंद झाली. यात रामटेक शहरातील ८ तर ग्रामीणमधील ३९ रुग्णांचा समावेश आहे. तालुक्यात आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ६,२२८ इतकी झाली आहे. यातील ४,८२९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. सध्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या १३९९ इतकी आहे. उमरेड तालुक्यात ९७ रुग्णांची नोंद झाली. यात शहरातील ५६ तर ग्रामीण भागातील ४१ रुग्णांचा समावेश आहे. मौदा तालुक्यात ३६९ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यात आतापर्यंत ९४ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
हिंगण्यात मृत्यूसंख्या २३४ वर
हिंगणा तालुक्यात ४०४ नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या. तीत ७७ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. तालुक्यातील चार रुग्णांचा मृत्यू झाला. वानाडोंगरी येथे २१, हिंगणा ११, डिगडोह व टाकळघाट येथे प्रत्येकी ७, इसासनी व मांडवघोराड प्रत्येकी ४, गौराळा व गुमगाव प्रत्येकी ३, कान्होलीबारा व नीलडोह प्रत्येकी २, खैरी पन्नासे, सावंगी आसोला, आसोला, टेंभरी, भांसुली, आमगाव, सावंगी देवळी, रायपूर, वडधामना, नागाझरी, माथनी, नागलवाडी व किन्ही धानोली येथे प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झाली. तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १०,८६९ इतकी झाली आहे. यातील ८,४०९ रुग्ण कोरोनामुक्त झाले. तालुक्यात आतापर्यंत २३४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.