पुरामुळे रस्ते व नाल्याचे २१७ कोटीचे नुकसान; नुकसानीच्या पंचनाम्याचेही काम झाले पूर्ण

By मंगेश व्यवहारे | Published: October 3, 2023 09:13 PM2023-10-03T21:13:52+5:302023-10-03T21:14:30+5:30

मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी नुकसानीचा आढावा घेतला.

217 crore damage to roads and drains due to floods panchnama of damage has also been completed | पुरामुळे रस्ते व नाल्याचे २१७ कोटीचे नुकसान; नुकसानीच्या पंचनाम्याचेही काम झाले पूर्ण

पुरामुळे रस्ते व नाल्याचे २१७ कोटीचे नुकसान; नुकसानीच्या पंचनाम्याचेही काम झाले पूर्ण

googlenewsNext

मंगेश व्यवहारे, नागपूर : शहरात २२ सप्टेंबरच्या मध्यरात्री आलेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे नागपूर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नाले व रस्त्याचे २१७ कोटीचे नुकसान झाले आहे. मनपा आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांनी मंगळवारी नुकसानीचा आढावा घेतला.

मनपा मुख्यालयातील आयुक्त सभाकक्षात झालेल्या आढावा बैठकीत अतिरिक्त आयुक्त आंचल गोयल, डॉ. सुनील लहाने, मुख्य अभियंता राजीव गायकवाड, मनोज तालेवार, उपायुक्त मिलींद मेश्राम, कार्यकारी अभियंता रवींद्र बुंधाडे, मनोज सिंग, उज्ज्वल धनविजय, अजय पझारे, अनिल गेडाम, अजय माटे आदी उपस्थित होते.

पूरपरिस्थितीमुळे सर्वाधिक १६३.७० कोटी रुपयांचे नाल्यांचे नुकसान झाले आहे. रस्त्यांचे ५३.४० कोटी असे एकूण २१७ कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती बैठकीत मुख्य अभियंत्यांनी दिली. पुरग्रस्त भागांमध्ये नाले आणि रस्त्यांची दुरावस्था झालेली असून त्यासंदर्भात तात्काळ कार्यवाहीच्या दृष्टीने सविस्तर प्रस्ताव सादर करणे तसेच ज्या भागातील नाल्याची भिंत पडलेली आहे, अशा भागांमध्ये तात्काळ तात्पुरत्या स्वरूपात व्यवस्था पूर्ण करण्याचे निर्देश मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. नागपूर शहरातील विविध भागांमधील जुने धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचेही आयुक्तांनी निर्देशित केले. नागपूर शहरामधील पुरग्रस्त भागातील घरांच्या नुकसानाचे पंचनामे पूर्ण झाल्याची देखील माहिती बैठकीमध्ये सादर करण्यात आली.

Web Title: 217 crore damage to roads and drains due to floods panchnama of damage has also been completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.