२१, ८२९ लाभार्थ्यांनी घेतली लस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2021 04:08 AM2021-03-21T04:08:55+5:302021-03-21T04:08:55+5:30
-शहरात ११,१०० तर ग्रामीणमध्ये १०,७२९ लसीकरण नागपूर : रविवार सुटीचा दिवस, लसीकरण बंद राहणार असल्याने आज शहर व ग्रामीणमधील ...
-शहरात ११,१०० तर ग्रामीणमध्ये १०,७२९ लसीकरण
नागपूर : रविवार सुटीचा दिवस, लसीकरण बंद राहणार असल्याने आज शहर व ग्रामीणमधील सर्वच लसीकरण केंद्रांवर गर्दी उसळली होती. नागपूर जिल्ह्यात शनिवारी २१,८२९ लाभार्थ्यांचे लसीकरण झाले. यात शहरातील ११,१०० तर, ग्रामीणमध्ये १०,७२९ लाभार्थ्यांनी लस घेतली.
शहरातील एकूण ७३ केंद्रांवर १२२४ हेल्थ वर्कर, १४०७ फ्रंटलाइन वर्कर, ४५ वर्षांवरील गंभीर आजार असलेल्या १९५६ लाभार्थ्यांना व ६० वर्षांवरील ५,१४९ ज्येष्ठांनी असे एकूण ९७३६ लाभार्थ्यांनी पहिला डोस घेतला. १३६४ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. एकूण १११०० लोकांचे लसीकरण झाले. विशेष म्हणजे, शहरातील चार केंद्रांवर कोव्हॅक्सिन लस दिली जात आहे. यात मेडिकल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय कामठी रोड, विवेका हॉस्पिटल व मनपाच्या महाल येथील रोगनिदान केंद्राचा समावेश आहे.
ग्रामीण भागात २०४ हेल्थ वर्कर, ८४६ फ्रंटलाइन वर्कर, ४५ वर्षांवरील १६७६ तर ६० वर्षांवरील ७,५६२ ज्येष्ठांनी पहिला डोस घेतला. तर, ४४१ लाभार्थ्यांनी दुसरा डोस घेतला. अशा एकूण १०,७२९ लाभार्थ्यांनी लस घेतली.