नागपूर जिल्ह्यात २२ सक्रिय कोरोना रुग्ण; २४ तासांत ३ ‘पॉझिटिव्ह’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2021 08:37 PM2021-11-09T20:37:07+5:302021-11-09T20:37:35+5:30

Nagpur News नागपुरात ‘कोरोना’च्या सक्रिय रुग्णांची संख्या घटत असून मागील २४ तासांत १० रुग्ण बरे झाले. तर नवे तीन बाधित आढळले.

22 active corona patients in Nagpur district; 3 'positives' in 24 hours | नागपूर जिल्ह्यात २२ सक्रिय कोरोना रुग्ण; २४ तासांत ३ ‘पॉझिटिव्ह’

नागपूर जिल्ह्यात २२ सक्रिय कोरोना रुग्ण; २४ तासांत ३ ‘पॉझिटिव्ह’

Next
ठळक मुद्दे ग्रामीणमध्ये परत शून्य नोंद

नागपूर : ‘कोरोना’च्या सक्रिय रुग्णांची संख्या घटत असून मागील २४ तासांत १० रुग्ण बरे झाले. तर नवे तीन बाधित आढळले. यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या २२ वर पोहोचली आहे. सोमवारच्या तुलनेत मंगळवारी चाचण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढलेली दिसून आली.

मंगळवारी जारी करण्यात आलेल्या अहवालानुसार २४ तासांत २ हजार ६९७ चाचण्या झाल्या. त्यातील १ हजार ८७९ चाचण्या शहरात तर ८१८ चाचण्या ग्रामीण भागात झाल्या. नागपूर जिल्ह्यात रुग्णांची एकूण संख्या ४,९३,४८० झाली असून मृतांची संख्या १०,१२१वर स्थिर आहे.

शहरात रुग्णांची एकूण संख्या ३,४०,३९१ वर पोहोचली असून ग्रामीणमधील रुग्णांची संख्या १,४६,१९९ वर कायम आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या ४,८३,३३७ झाली आहे. सध्या शहरातील १९, ग्रामीणमधील तीन रुग्ण सक्रिय आहेत.

: कोरोनाची मंगळवारची स्थिती

दैनिक चाचण्या : २६९७

शहर : तीन रुग्ण व ० मृत्यू

ग्रामीण : ० रुग्ण व ० मृत्यू

एकूण बाधित रुग्ण : ४,९३,४८०

एकूण सक्रिय रुग्ण : २२

एकूण बरे झालेले रुग्ण : ४,८३,३३७

एकूण मृत्यू : १०,१२१

Web Title: 22 active corona patients in Nagpur district; 3 'positives' in 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.