उपराजधानीत कोरोनाचे पुन्हा २२ रुग्ण; आरोग्यविभाग चिंतेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2023 07:57 PM2023-04-01T19:57:58+5:302023-04-01T19:59:50+5:30

Nagpur News कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावाने चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी २२ रुग्ण आढळून आले असताना शनिवारी तेवढ्याच रुग्णांची भर पडली.

22 more patients of Corona; The health department is concerned | उपराजधानीत कोरोनाचे पुन्हा २२ रुग्ण; आरोग्यविभाग चिंतेत

उपराजधानीत कोरोनाचे पुन्हा २२ रुग्ण; आरोग्यविभाग चिंतेत

googlenewsNext


नागपूर : कोरोनाचा वाढत्या प्रादूर्भावाने चिंता वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी २२ रुग्ण आढळून आले असताना शनिवारी तेवढ्याच रुग्णांची भर पडली. यातील २० रुग्ण शहरातील असून २ रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. रुग्णांची एकूण संख्या ५ लाख ८७ हजार ५७३ झाली आहे तर, मृतांची संख्या १० हजार ३५८वर स्थिर आहे.
   

 नागपूर शहर व ग्रामीण मिळून मागील चौविस तासांत १६५ चाचण्या झाल्या. त्यातील १३ टक्के रुग्ण पॉझिटिव्ह आले. आज कोरोनाचे९ रुग्ण रुग्णालयातून घरी परतले. सध्यास्थितीत शहरात ६१, ग्रामीण भागात १९ तर जिल्हाबाहेरील ३ असे ८३ रुग्ण अ‍ॅक्टीव्ह आहेत. यातील मेडिकलमध्ये १३, रेल्वे हॉस्पिटलमध्ये ७, प्रादेशिक मनोरुग्णालयात २, एम्समध्ये १ तर खासगी रुग्णालयात ५ असे एकूण २८ रुग्ण रुग्णालयात आहेत. तर ५५ रुग्ण गृहविलगीकरणात आहेत.


- पाच दिवसांत ७२ रुग्ण
मागील पाच दिवसांत नागपूर जिल्ह्यात कोरोनाचे ७२रुग्ण आढळून आले. यात २८ मार्च रोजी १७, २९ मार्च रोजी ८, ३० मार्च रोजी २२, ३१ मार्च रोजी ३ तर १ एप्रिल रोजी २२ रुग्णांची नोंद झाली. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य विभागाने पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग करून जास्तीत जास्त कोव्हिड चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Web Title: 22 more patients of Corona; The health department is concerned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.