२२ नाही, बाराच महिन्यात मिळेल संत्र्याची कलम ()
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:08 AM2021-07-31T04:08:19+5:302021-07-31T04:08:19+5:30
निशांत वानखेडे नागपूर : संत्रा, माेसंबी या निंबूवर्गीय फळांची कलमे तयार व्हायला कमीत कमी २२ महिन्यांचा कलावधी लागताे. कर्नाटकी ...
निशांत वानखेडे
नागपूर : संत्रा, माेसंबी या निंबूवर्गीय फळांची कलमे तयार व्हायला कमीत कमी २२ महिन्यांचा कलावधी लागताे. कर्नाटकी संत्र्याचे कलम तर दाेन वर्षापर्यंतचा कालावधी घेते. मात्र यापुढे संत्रा, माेसंबीची कलमे अवघ्या १०-१२ महिन्यातच शेतात लागवडीसाठी उपलब्ध हाेणार आहेत. निंबूवर्गीय फळ संशाेधन संस्था (सीसीआरआय) च्या संशाेधकांनी या तंत्राद्वारे लागवडीलायक लाखाे राेपे तयार करण्यात यश मिळविले आहे.
सीसीआरआयच्या ज्येष्ठ संशाेधक डाॅ. विजयाकुमारी नरूकुल्ला यांनी ‘डायरेक्ट सीडिंग मेथड’ हे तंत्र विकसित केले आहे. सामान्यपणे संत्रा, माेसंबीची लागवडीलायक कलमे तयार व्हायला २२ महिन्यांचा कालावधी लागताे. यामध्ये बीज टाकल्यानंतर ६ ते ७ महिने, प्राथमिक व दि्वतीय नर्सरी फेजचे ७ ते ८ महिने आणि बडिंगचा कालावधी ७ ते ८ महिन्यांचा असताे. तेव्हाच ते शेतकऱ्यांना लागवडीसाठी उपयुक्त ठरते. डाॅ. विजयाकुमारी यांनी गुणवत्तापूर्ण संत्र्याचे बीज सुपीक माती, रेती व शेणखत असलेल्या पाॅलिबॅगमध्ये टाकून राेपे तयार केली आहेत. या तंत्राद्वारे त्यांनी नर्सरीचा कालावधी संपविला आणि बडिंगचा काळही कमी केला आहे. यामध्ये मुळांची गुंडाळी हाेणे घटते आणि राेप वाढण्यास मदत हाेते. यामुळे लागवडीलायक कलम तयार व्हायला केवळ १२ महिन्यांचा कालावधी लागताे. डाॅ. विजयाकुमारी यांनी सीसीआरआयच्या नर्सरीमध्ये लाखाे कलमे यशस्वीपणे तयार केली आणि शेतकऱ्यांना वितरितही केली आहेत.
मायक्राे बडिंगने आणखी दाेन महिने कमी
यामध्ये ‘मायक्राे बडिंग तंत्रा’चा वापर करून कलम तयार हाेण्याचा कालावधी आणखी दाेन महिने घटविण्यातही त्यांना यश आले आहे. मात्र हे तंत्र थाेडे गुंतागुंतीचे असल्याने प्रशिक्षणाशिवाय ते उपयाेगात आणणे शक्य नसल्याचे डाॅ. विजयाकुमारी यांनी सांगितले.
लागवडीचा खर्च ५० टक्केने घटला
लागवडीलायक एक कलम तयार व्हायला १२० रुपये लागतात. तंत्राद्वारे नर्सरीचा कालावधी कमी झाल्याने हा खर्च ६० रुपयांवर येताे. म्हणजे कलम तयार करण्याचा कालावधी १० महिन्यांनी घटला आहे. त्यामुळे कलम व लागवडीचा खर्चही ५० टक्केने घटला आहे.
दाेन शेतकऱ्यांनी यशस्वी केला प्रयाेग
नरखेड येथील प्रशांत आणि नांदेडचे शेतकरी संदीप पडलवार यांनी सीसीआरआयच्या तंत्राद्वारे कलम लागवडीचा यशस्वी प्रयाेग केला आहे. २ काेटी राेपे तयार करणाऱ्या नांदेडच्या पडलवार यांनी ४० काेटींची बचत केली आहे.
काेणतेही कृषी संशाेधन प्रयाेगशाळेतून शेतापर्यंत पाेहोचले, तेच महत्त्वाचे असते. डायरेक्ट सीड मेथड व मायक्राे बडिंग तंत्र शेतापर्यंत पाेहोचले आणि यशस्वी ठरले, हे आमच्यासाठी समाधान देणारे आहे.
- डाॅ. विजयाकुमारी नरूकुल्ला, संशाेधक, सीसीआरआय