नागपुरातील २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक
By योगेश पांडे | Published: April 26, 2023 06:02 PM2023-04-26T18:02:03+5:302023-04-26T18:02:32+5:30
नागपुरातील २२ अधिकारी-कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक घोषित करण्यात आले आहे.
नागपूर : राज्य पोलीस दलात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस महासंचालक पदक घोषित करण्यात आले. यात नागपुरातील एकूण २२ अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त ही पदके प्रदान करण्यात येतात.
नागपुरातील चार अधिकारी व १६ कर्मचाऱ्यांना हे पदक घोषित झाले आहे. यात गुन्हे शाखेचे ज्ञानेश्वर भेदोडकर, धनंजय पाटील, जग्वेंद्रसिंह राजपूत आणि भरत क्षीरसागर हे अधिकारी आहेत. तर विलास इंगळे, प्रशांत कोडापे, धनराज सरोदे, संदीप पाटील, ग्रामीणमधील रत्नाकर ठाकरे, रविंद्र श्रीवास, दर्शनकुमार मिसार, चंद्रशेखर गडेकर, दामोदर भोयर, महेंद्रसिंह खंडाते, एजाज शेख तसेच राज्य राखीव दलाचे निलेश गायकवाड, सुरेश तोडेकर, प्रकाश बघेल, राजेश ठाकरे आणि आशिष सालफळे यांना पोलीस महासंचालक पदक घोषित झाले आहे.राज्य पोलीस दलात सलग १५ वर्षे उत्तम अभिलेख, प्रसंशनीय कार्य, क्लिष्ट आणि बहुचर्चित गुन्ह्यांची उकल, नैसर्गिक आपत्तीत योगदान, उत्कृष्ट तपास, दोषसिद्धीत योगदान अशा कामगिरीच्या आधारावर या पदकाची घोषणा करण्यात येते.