संशयित तरुणाकडून २.२२ लाखांची एमडी पावडर जप्त
By योगेश पांडे | Published: September 2, 2024 04:19 PM2024-09-02T16:19:07+5:302024-09-02T16:21:43+5:30
Nagpur : दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल
योगेश पांडे - नागपूर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हसनबाग परिसरातून एका संशयित तरुणाची झडती घेतली असता त्याच्याकडून २.२२ लाखांची एमडी पावडर जप्त करण्यात आली. गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक चारच्या पथकाने ही कारवाई केली.
रविवारी मध्यरात्रीनंतर ही कारवाई करण्यात आली. गुन्हे शाखेचे पथक नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत असताना एक संशयित व्यक्ती दिसला. त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ २२ ग्रॅम एमडी पावडर आढळली. त्याने त्याचे नाव शेख शाहबाज उर्फ तुरानी शेख सलीम (२१, हसनबाग) असे सांगितले. त्याने असु बयालिस याच्या मदतीने एमडी पावडर घेतली होती. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात एनडीपीएस ॲक्टअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शेखला नंदनवन पोलीस ठाण्याच्या हवाली करण्यात आले असून बयालिसचा शोध सुरू आहे. पोलीस निरीक्षक सुहास चौधरी, वैभव बारंगे, शेख नाजीर, युवानंद कडू, सतिश ठाकरे, पुरुषोत्तम जगनाडे, पुरुषोत्तम काळमेघ, महेश काटवले यांच्या पथकाने ही कारवाई केली.