२२२.०९ कोटींचा प्रकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 6, 2021 04:11 AM2021-09-06T04:11:22+5:302021-09-06T04:11:22+5:30
.. मागणी करूनही मोबदला नाही प्रकल्पासाठी जमीन वा भूखंड देण्यास तयारी दर्शविलेल्या लोकांनी यासाठी मोबदल्याची मागणी केली. परंतु तीन ...
..
मागणी करूनही मोबदला नाही
प्रकल्पासाठी जमीन वा भूखंड देण्यास तयारी दर्शविलेल्या लोकांनी यासाठी मोबदल्याची मागणी केली. परंतु तीन वर्षात त्यांना कुठल्याची प्रकारचा मोबदला मिळालेला नाही. राजकीय हस्तक्षेपामुळे काही मोजक्याच लोकांना मोबदला देण्यात आला. घर तुटले, प्लाट गेला, पण मोबदला नाही. अशी अवस्था या भागातील लोकांची झाली आहे.
...
पुनर्वसनाचा शब्द पाळला नाही
प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन करण्याचा शब्द देण्यात आला होता. मात्र, अजूनही मोबदला मिळाला नाही. दोन वर्षात हा प्रकल्प कागदावरच आहे. ज्यांची घरे गेली, त्यांना मोबदला देण्याची तरतूद आहे. झोपडपट्टीसाठी ७५० रुपये प्रति वर्ग फूट, सेमी लोडबेअरिंग हाऊससाठी १,३५० रुपये प्रति वर्ग फूट, तर आरसी स्ट्रक्चर असणाऱ्या घरांसाठी २,२५० रुपये प्रति वर्ग फूट असा मोबदला अपेक्षित आहे. दुसरीकडे ३ कोटीहून अधिक मोबदला दिल्याचा स्मार्ट सिटीचा दावा आहे.