म्युकरमायकोसिसमुळे विदर्भात २२८ जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2021 12:13 PM2021-08-13T12:13:20+5:302021-08-13T12:16:51+5:30

Nagpur News mucormycosis विदर्भातील ११ जिल्ह्यात म्युकरमायकोसिस या आजारामुळे २२८ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ७५१ जणांवर उपचार सुरू आहेत.

228 killed in Vidarbha due to mucormycosis | म्युकरमायकोसिसमुळे विदर्भात २२८ जणांचा मृत्यू

म्युकरमायकोसिसमुळे विदर्भात २२८ जणांचा मृत्यू

Next
ठळक मुद्दे१४५७ जणांनी केली आजारावर मात ७५१ जणांवर विविध ठिकाणी उपचार

विशाल सोनटक्के

यवतमाळ : कोरोनाचा प्रादुर्भाव बहुतांश जिल्ह्यात कमी झाला असला तरी कोरोनामुक्त झाल्यानंतर उद्भवणाऱ्या म्युकरमायकोसिसचा कहर अद्यापही कायम असल्याचे चित्र आहे. राज्यात या आजारामुळे आजवर १२७७ जणांचा मृत्यू झाला आहे, तर १९१९ जणांवर उपचार सुरू आहेत. विदर्भाचा विचार करता विदर्भातील ११ जिल्ह्यात या आजारामुळे २२८ जणांचा मृत्यू झाला असून सध्या ७५१ जणांवर उपचार सुरू आहेत.

पहिल्या लाटेनंतर आलेल्या दुसऱ्या लाटेचा कहर राज्याने अनुभवला आहे. या लाटेत रुग्णांची संख्या विक्रमी झाली होती. त्यानंतर ही लाट ओसरत गेली. मात्र, कोरोनातून बऱ्या झालेल्यांपैकी अनेक रुग्णांना म्युकरमायसेटिस या बुरशीमुळे म्युकरमायकोसिस या रोगाची लागण झाली. मधुमेह नियंत्रित नसणे आणि प्रतिकारशक्ती क्षीण झाल्यामुळे या आजाराचे रुग्ण विदर्भासह राज्यभरात वाढले. आरोग्य विभागाकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार १० ऑगस्टपर्यंत राज्यात म्युकरमायकोसिसची ९८४६ जणांना बाधा झाली. त्यातील ६४६६ जण बरे झाले असले तरी या आजाराने तब्बल १२७७ जणांचा मृत्यू झाला.

विदर्भामध्येही मोठ्या प्रमाणात म्युकरमायकोसिसचा फैलाव झाला होता. या भागातील ११ जिल्ह्यांत २४७३ जण या आजाराच्या विळख्यात सापडले होते. त्यातील १४५७ जण बरे झाले, तर २८८ जणांना मात्र प्राणाला मुकावे लागले. सध्या विदर्भातील विविध जिल्ह्यात ७५१ जणांवर उपचार सुरू आहेत. यातील गडचिरोली जिल्ह्याची माहिती उपलब्ध झालेली नाही.

 

Web Title: 228 killed in Vidarbha due to mucormycosis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.