२३ मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Published: August 28, 2014 02:01 AM2014-08-28T02:01:53+5:302014-08-28T02:01:53+5:30

महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या चमूने बुधवारी प्लॉस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) मूर्तींची तपासणी करण्यासाठी चितारओळीत प्रवेश करताच तेथील मूर्ती विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली.

23 Action on idol shoppers | २३ मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

२३ मूर्ती विक्रेत्यांवर कारवाई

Next

दंड वसूल : पीओपी मूर्तींवर लाल चिन्ह नाही
नागपूर : महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या चमूने बुधवारी प्लॉस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) मूर्तींची तपासणी करण्यासाठी चितारओळीत प्रवेश करताच तेथील मूर्ती विक्रेत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. अभियानात ७६ दुकानांची तपासणी करण्यात आली.
कारवाईत २३ दुकानदारांकडे ‘पीओपी’ मूर्ती आढळल्या. त्यावर कुठलेही लाल रंगाचे चिन्ह किंवा विसर्जनासंबंधी कुठलीच माहिती लिहिलेली नव्हती. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रत्येक दुकानदाराकडून ५०० रुपये दंड आकारण्यात आला. कारवाई दरम्यान काही दुकानदारांनी विरोध करण्याचा प्रयत्न केला. परंतु महानगरपालिकेच्या चमूने त्यांची समजूत घालून नियमावर बोट ठेवले. त्यानंतर प्रकरण शांत झाले.
गुरुवारी महापालिकेची चमू बाजारात लागलेल्या दुकानांची पाहणी करणार आहे. विशेष म्हणजे, कारवाईची माहिती मिळताच काही विक्रेत्यांनी ‘पीओपी’ मूर्तींवर लाल रंगाचे चिन्ह लावण्यास सुरुवात केली. परंतु ते सर्वच मूर्तीवर असे चिन्ह लावू शकले नाहीत.
गांधीबाग झोनचे सहायक आयुक्त राजू भिवगडे यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली.
भिवगडे यांनी सांगितले की, तलावांना प्रदूषणापासून वाचविण्यासाठी ाहानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने प्लॉस्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तींवर बंदी घातली आहे. नागरिकांना त्रास देणे हा या मोहिमेचा उद्देश नसून त्यांच्यामध्ये जागरुकता निर्माण करणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: 23 Action on idol shoppers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.