कोरोनाचे २३० रुग्ण, ३१३ बरे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2021 04:09 AM2021-02-10T04:09:37+5:302021-02-10T04:09:37+5:30

नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जवळपास ८० टक्क्याने कमी झाली; परंतु मागील तीन महिन्यांपासून २५० ...

230 corona patients, 313 cured | कोरोनाचे २३० रुग्ण, ३१३ बरे

कोरोनाचे २३० रुग्ण, ३१३ बरे

Next

नागपूर : ऑगस्ट व सप्टेंबर महिन्याच्या तुलनेत कोरोनाबाधितांची संख्या जवळपास ८० टक्क्याने कमी झाली; परंतु मागील तीन महिन्यांपासून २५० ते ३५० दरम्यान रुग्णसंख्या स्थिरावल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. मंगळवारी २३० बाधितांची नोंद झाली असताना ३१३ रुग्ण बरे झाले. ६ रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांची एकूण संख्या १३६६०७, तर मृतांची संख्या ४२०३ वर गेली.

नागपूर जिल्ह्यात २८ जानेवारीनंतर पहिल्यांदाच चाचण्यांची संख्या पाच हजारावर गेली. ४४०३ आरटीपीसीआर, तर ९४१ रॅपीड अँटिजन असे एकूण ५३४४ चाचण्या झाल्या. यातून पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील २०१, ग्रामीणमधील २७, तर जिल्ह्याबाहेरील २ रुग्णांचा समावेश आहे. मृतांमध्ये शहरातील ३, ग्रामीण भागातील १, तर जिल्ह्याबाहेरील २ मृत्यू आहेत. मागील काही दिवसांपासून दैनंदिन पॉझिटिव्ह रुग्णसंख्येच्या तुलनेत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक राहत आहे. यामुळे कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ९४.६२ टक्क्यांवर गेले आहे. आतापर्यंत १२९२६२ कोरोनामुक्त झाले आहेत.

: होम आयसोलेशनमध्ये २३०१ रुग्ण

नागपूर जिल्ह्यात ३१४२ कोरोनाचे रुग्ण अ‍ॅक्टिव्ह आहेत. यातील २३०१ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये, तर ८४१ रुग्ण शासकीयसह खासगी रुग्णालयात भरती आहेत. शहरात अ‍ॅक्टिव्ह असलेल्या रुग्णांची संख्या २३६९ आहे, तर ग्रामीणमध्ये ७७३ आहे. भरती असलेल्या रुग्णांमध्ये मेयो व मेडिकलमध्ये प्रत्येकी ८५, तर एम्समध्ये १२, इंदिरा गांधी रुग्णालयात २२, पाचपावली कोविड हेल्थ सेंटरमध्ये ३, आयसोलेशन हॉस्पिटलमध्ये १७, तर उर्वरित खासगी हॉस्पिटलमध्ये भरती आहेत. यात गंभीर रुग्णांची संख्या फार कमी असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

-दैनिक संशयित : ५३४४

-बाधित रुग्ण : १३६६०७

_-बरे झालेले : १२९२६२

- उपचार घेत असलेले रुग्ण : ३१४२

- मृत्यू : ४२०३

Web Title: 230 corona patients, 313 cured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.