कामठी तालुक्यात ८७ जागांसाठी २३९ अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:10 AM2020-12-31T04:10:44+5:302020-12-31T04:10:44+5:30
कामठी : तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या ८७ जागांसाठी एकूण २३९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या सर्व ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ ...
कामठी : तालुक्यातील ९ ग्रामपंचायतींच्या ८७ जागांसाठी एकूण २३९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. या सर्व ग्रामपंचायतींसाठी येत्या १५ जानेवारीला मतदान हाेणार आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस (बुधवार, दि. ३०) असल्याने उमेदवारांनी तहसील कार्यालयात गर्दी केली हाेती.
काेराडी ग्रामपंचायतच्या १७ जागांसाठी (सहा प्रभाग) ५२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, येथे ७,८७७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लोणखैरी ग्रामपंचायत ९ जागांसाठी (तीन प्रभाग) २० उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. येथे एकूण २,१८० मतदार मतदान करणार आहेत. खेडी येथे ९ जागांसाठी २२ उमेदवारी अर्ज (तीन प्रभाग)दाखल करण्यात आले असून, येथे १,९१६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. टेमसना येथे ९ जागांसाठी २७ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज (तीन प्रभाग) दाखल केले असून, येथे एकूण १,४५६ मतदार आहेत. केसोरी येथे ७ जागांसाठी १७ उमेदवारी अर्ज (तीन प्रभाग) दाखल करण्यात आले असून, येथे १,००८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
भामेवाडा येथे ७ जागांसाठी १७ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र (तीन प्रभाग) दाखल केले असून, येथे एकूण ९६० मतदार आहेत. महालगाव येथे ११ जागांसाठी ३६ उमेदवारी अर्ज (चार प्रभाग) दाखल करण्यात आले असून, येथे २,२८८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. पवनगाव येथे ९ जागांसाठी २२ उमेदवारांनी उमेदवारी अर्ज (तीन प्रभाग) दाखल केले असून, येथे एकूण १,५७२ मतदार आहेत. घोरपड येथे ९ जागांसाठी (तीन प्रभाग) २६ जणांनी त्यांचे उमेदवारी अर्ज दाखल केले असून, येथे १,८६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. उमेदवारी अर्ज ऑनलाईन भरणे अनिवार्य असले तरी सर्व्हर डाऊन असल्यामुळे काहींनी ऑफलाईन अर्ज सादर केले.