Corona Virus; विदर्भात एकाच दिवशी २३९० चाचण्या शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 30, 2020 10:36 AM2020-05-30T10:36:03+5:302020-05-30T10:39:08+5:30

भारतात इतर देशाच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण खूप कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आसीएमआर) माहितीनुसार दर दहा लाख लोकांमागे २००७ लोकांच्या चाचण्या होत असल्याचे समोर आले. यामुळे दरम्यानच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात चाचणीची सोय करण्यावर भर दिला जात आहे.

2390 tests possible in a single day in Vidarbha | Corona Virus; विदर्भात एकाच दिवशी २३९० चाचण्या शक्य

Corona Virus; विदर्भात एकाच दिवशी २३९० चाचण्या शक्य

googlenewsNext
ठळक मुद्देनागपुरात रोज १७९० कोरोना तपासणी होऊ शकतेमेडिकलची ७०० चाचण्यांची क्षमता

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोरोनाबाधित रुग्ण शोधून काढत त्याच्यावर उपचार करण्यासाठी सर्वात आवश्यक बाबत ठरते ती म्हणजे कोरोना चाचणी. जितक्या अधिक कोरोना चाचण्या होतील, तितक्या जलदगतने कोरोना रुग्णांवर उपाार करून संसर्गाला आळा घालता येईल. विदर्भात ११ प्रयोशाळा आहेत. यांची प्रतिदिवस चाचण्यांची क्षमता २३९० आहे. एवढ्या मोठ्या संख्येत चाचण्या झाल्यास विदर्भात कोरोनाचा प्रादूर्भाव नियंत्रणात आणण्यास मदत होईल, असे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. प्रत्येक संशयिताची चाचणी आवश्यक आहे. जोपर्यंत कोरोनाची लागण झालेल्या सगळ्या लोकांची चाचणी होत नाही, तोवर त्यांना वेगळं काढून क्वारंटाईनमध्ये ठेवता येणार नाही. आणि तसे झाले नाही तर ते इतर लोकांमध्ये राहून कोरोना पसरवत राहतील. यामुळे चाचणी खूप महत्त्वाची आहे. परंतु भारतात इतर देशाच्या तुलनेत चाचण्यांचे प्रमाण खूप कमी आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आसीएमआर) माहितीनुसार दर दहा लाख लोकांमागे २००७ लोकांच्या चाचण्या होत असल्याचे समोर आले. यामुळे दरम्यानच्या काळात प्रत्येक जिल्ह्यात चाचणीची सोय करण्यावर भर दिला जात आहे. राज्यात ‘आसीएमआर’ने ४२ प्रयोगशाळांना मंजुरी दिल्या आहेत. यातील ११ प्रयोगशाळा विदर्भात आहेत. रोजची चाचण्यांची क्षमता २३९० आहे. परंतु एवढ्या चाचण्या होत नसल्याचे वास्तव आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाने (डीएमईआर) सर्व प्रयोगशाळांना पत्र पाठविले आहे. क्षमतेनुसार चाचण्या न झाल्यास संबंधित संस्थेच्या प्रमुखाला जाब विचारून कारवाई करण्यात येईल, असे पत्रच ‘डीएमईआर’ने सर्व प्रयोगशाळांना पाठविले आहे.

११ प्रयोगशाळा आणि चाचण्यांची क्षमता

विदर्भात ११ प्रयोगशाळा आहेत. सर्वाधिक क्षमता नागपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) प्रयोगशाळेची आहे. येथे रोज ७०० तपासण्य होऊ शकतात. त्यानंतर इंदिरा गांधी शासकी वैद्यकीय महाविद्याल व रुग्णालयाचा (मेयो) प्रयोगशाळेची क्षमता ४०० आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची (एम्स) चाचणी क्षमता ३९० आहे. मेडिकल अकोलची २५०, माफसू, निरी, एमजीआयएमएस वर्धा व सेंट जीबी युनिर्व्हसीटी अमरावतीची क्षमता प्रत्येकी १२५ तर नागपूरची आयआरएल, मेडिकल चंद्रपूर, मेडिकल यवतमाळ यांची क्षमता प्रत्येकी ५० आहे.

नागपुरात रोज १७९० तपासण्या

नागपुरात सहा प्रयोगशाळा आहेत. यात मेडिकल, मेयो, एम्स, माफसू, नीरी व आयआरएल प्रयोगशाळा आहे. यांची रोजच्या चाचण्यांची क्षमता १७९० आहे. परंतु जिल्हा महिती विभागाच्या माहितीनुसार गेल्या १२ तासांत ३२६ नमुने तपासण्यत आले आहे. विशेष म्हणजे, विभागीय आयुक्तांनी जास्तीत जास्त संशयितांचे नमुने घेण्यासाठी शासकीय आयुर्वेदीक महाविद्यालय व रुग्णालय आणि शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयावर जबाबदारी सोपविली आहे.

प्रत्येक प्रयोगशाळा आपल्या पद्धतीने चांगले काम करीत आहे. या प्रयोगशाळांना इतक्या क्षमतेपर्यंत चाचण्या करता येऊ शकतात, असे पत्र दिले आहे.

डॉ. तात्यराव लहाने संचालक, वैद्यकीय शिक्षण विभाग

 

 

Web Title: 2390 tests possible in a single day in Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.