एका ट्रकमध्ये कोंबली २४ गोवंश जनावरे, तीन आरोपींना अटक
By योगेश पांडे | Updated: April 12, 2024 17:21 IST2024-04-12T17:20:34+5:302024-04-12T17:21:58+5:30
एका ट्रकमध्ये २४ गोवंश जनावरे कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

एका ट्रकमध्ये कोंबली २४ गोवंश जनावरे, तीन आरोपींना अटक
योगेश पांडे, नागपूर : एका ट्रकमध्ये २४ गोवंश जनावरे कोंबून त्यांची वाहतूक करणाऱ्या आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे.
गुरुवारी ही कारवाई करण्यात आली. खबऱ्यांच्या माध्यमातून पोलिसांना भंडारा मार्गावरून गोवंशांची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचून एमपी ९ जीएच ४८३५ या ट्रकला थांबविले. त्याची तपासणी केली असता मागील भागात २४ गोवंश जनावरांना कोंबू५न भरले होते. या जनावरांना गोरक्षणमध्ये पाठविण्यात आले. पोलिसांनी राजू मदन पाल (४०, गुलशननगर, कळमना), कमलेश नत्थुलाल गुप्ता (४१, आनंदनगर, यशोधरानगर), देवेंद्र श्यामराव राऊत (३५, देवरी, गोंदिया) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली. त्यांच्या ताब्यातून २३.६० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक रणजित सिरसाट, सतिश आहेर, विशाल भाटिया, अजय शुक्ला, आशीष मेश्राम यांच्या पथकाने ही कारवाई केली.