२४ दिवसांपूर्वी ‘सीडीएस’ बिपीन रावत यांना नागपुरातला 'तो' अखेरचा ‘सॅल्यूट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2021 08:08 PM2021-12-08T20:08:06+5:302021-12-08T20:10:19+5:30

देशाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या रावत हे अवघ्या २४ दिवसांअगोदर नागपूरच्या भूमीवर होते.

24 days ago, CDS Bipin Rawat received his last salute from Nagpur. | २४ दिवसांपूर्वी ‘सीडीएस’ बिपीन रावत यांना नागपुरातला 'तो' अखेरचा ‘सॅल्यूट’

२४ दिवसांपूर्वी ‘सीडीएस’ बिपीन रावत यांना नागपुरातला 'तो' अखेरचा ‘सॅल्यूट’

Next
ठळक मुद्देवायुसेनेच्या मेन्टेनन्स कमांडला भेटविभागाच्या आत्मनिर्भरतेबाबत काढले होते गौरवोद्गार

नागपूर : ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत... ओतप्रोत भरलेले देशप्रेम, राष्ट्रसुरक्षेप्रति सदैव सजग, तीनही संरक्षण दलाची इत्थंभूत माहिती, करारी आवाज अन् भेदक नजर. त्यांचे नाव घेताच ‘डिफेन्स’मधील प्रत्येक अधिकारी-जवानाची छाती गर्वाने भरून येत होती. देशाला सर्वोच्च प्राधान्य देणाऱ्या रावत हे अवघ्या २४ दिवसांअगोदर नागपूरच्या भूमीवर होते. अवघ्या तीन आठवड्यांतच देशाच्या सर्वोच्च अधिकाऱ्याचे हेलिकॉप्टर क्रॅशमध्ये निधन झाल्यानंतर नागपुरातील अधिकारी व जवानांनादेखील धक्का बसला आहे. रावत यांना काही दिवसांअगोदर केलेले ‘सॅल्युट’ अखेरचे ठरेल, याची त्यांनी स्वप्नातदेखील कल्पना केली नव्हती.

१५ नोव्हेंबर रोजी ‘सीडीएस’ जनरल बिपीन रावत यांनी भारतीय वायुसेनेच्या नागपुरातील मेन्टेनन्स कमांडला भेट दिली होती. त्याच दिवशी नागपुरातील अधिकाऱ्यांनी कडक ‘सॅल्युट’ ठोकले होते. रावत यांनीदेखील त्याच जोशाने भाषण करत वायुदलाच्या आत्मनिर्भरतेबाबत गौरवोद्गार काढले होते. मेन्टेनन्स कमांड हा भारतीय वायुसेनेचा अतिशय महत्त्वाचा विभाग आहे. वायुसेनेच्या अमूल्य संपत्तीची देखभाल करण्याची महत्त्वाची जबाबदारी या विभागावर आहे. हा विभाग वेगात आत्मनिर्भर होत आहे. मेन्टेनन्स कमांड आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने वाटचाल करीत असल्यामुळे ही अतिशय अभिमानाची बाब आहे, असे ते गर्वाने म्हणाले होते. मेन्टेनन्स कमांडचे एयर ऑफिसर कमांडिंग इन चीफ एयर मार्शल शशिकर चौधरी यांनी जनरल बिपीन रावत यांचे स्वागत केले होते व रावत यांनी स्वदेशी विमाने व उपकरणांच्या प्रदर्शनालादेखील भेट दिली होती.

‘मल्टी मोड ग्रेनेड्स’चीदेखील केली होती पाहणी

शेवटच्या नागपूर दौऱ्यादरम्यान जनरल बिपीन रावत यांनी ‘ईईएल’ला (इकॉनॉमिक एक्सप्लोसिव्ह लिमिटेड) भेट दिली होती व कंपनीतर्फे भारतीय सैन्यदलासाठी उत्पादित करण्यात आलेल्या ‘मल्टी मोड ग्रेनेड्स’ची पाहणी केली होती. सोबत त्यांनी इतर एक्सप्लोसिव्ह, मिसाईल्स, आर्म्ड ड्रोन्सचीदेखील पाहणी केली होती.

Web Title: 24 days ago, CDS Bipin Rawat received his last salute from Nagpur.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.