२४ तासातच मावळला उत्साहाचा ‘योग’
By admin | Published: June 23, 2015 02:15 AM2015-06-23T02:15:06+5:302015-06-23T02:15:06+5:30
एखादा मोठा कार्यक्रम असला तर त्याच्या आयोजनासाठी सर्व जण मोठ्या उत्साहाने कामाला लागतात. तो कार्यक्रम यशस्वी
अनेकांचा संकल्प पावसात गेला वाहून : १७ टक्के नवख्यांनी केली योगासने
योगेश पांडे/जीवन रामावतल्ल नागपूर
एखादा मोठा कार्यक्रम असला तर त्याच्या आयोजनासाठी सर्व जण मोठ्या उत्साहाने कामाला लागतात. तो कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निर्माण झालेल्या वातावरणात समरसदेखील होतात. परंतु कार्यक्रम पार पडल्यावर मात्र अनेकदा आयोजनाच्या हेतूकडे पाठ फिरविण्यात येते. नेमका हाच प्रकार योगासनांच्या बाबतीतदेखील दिसून आला.
पहिल्या आंतरराष्ट्रीय योगदिवसाच्या निमित्ताने संपूर्ण देशाप्रमाणे उपराजधानीतदेखील ‘न भूतो न भविष्यति’ असा उत्साह दिसून आला. ‘अत्र तत्र सर्वत्र’ केवळ योगदिवसाचीच चर्चा दिसून आली. नियमित योगासने करणाऱ्यांसोबतच अगदी पहिल्यांदाच योगासन करणारेदेखील नागरिक सहभागी झाले होते. दुसऱ्या दिवशीदेखील नागपूरकरांंमध्ये योगासने करण्याबाबत नेमका असाच उत्साह होता का, याची ‘लोकमत’ने चाचपणी केली. नियमित योगसाधकांच्या साधनेत कुठलाही फरक पडला नसल्याचे यात आढळून आले.
टक्केवारी
योग केला (नवखे) १७ टक्के
योग केला (नियमित) २८ टक्के
योग केला नाही ५५ टक्के
नवख्यांमध्ये युवकांचे प्रमाण अधिक
तरुण ३७
मध्यमवयीन३५
ज्येष्ठ२८
आरोग्य व तणावमुक्तीसाठी योगमार्ग
आरोग्य५३ टक्के
तणावमुक्ती३१ टक्के
एकाग्रता१६ टक्के