विधिमंडळावर धडकणार २४ मोर्चे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2018 12:31 AM2018-07-04T00:31:23+5:302018-07-04T00:33:26+5:30

बुधवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी २४ मोर्चे धडकणार आहेत. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कोतवाल संघटना, विदर्भ पोलीस पाटील, निवृत्त कर्मचारी, पुस्तक विक्रेता, मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह, पोलीस बॉईज, महिला परिचर, विदर्भ राज्य आघाडी व केरोसिन हॉकर्स आपल्या मोर्चातून हल्लाबोल करतील. हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत या अधिवेशनात मोर्चाची संख्या कमी आहे.

24 marches on the Vidhi Mandal | विधिमंडळावर धडकणार २४ मोर्चे

विधिमंडळावर धडकणार २४ मोर्चे

googlenewsNext
ठळक मुद्देदोन मोर्चांनी सुरुवात : सीसीटीव्ही, ड्रोन कॅमेरे, हेल्मेट कॅमेऱ्यांची नजर


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बुधवारपासून विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. आपल्या मागण्या सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी २४ मोर्चे धडकणार आहेत. यात पीपल्स रिपब्लिकन पार्टी, कोतवाल संघटना, विदर्भ पोलीस पाटील, निवृत्त कर्मचारी, पुस्तक विक्रेता, मेडिकल रिप्रेझेन्टेटीव्ह, पोलीस बॉईज, महिला परिचर, विदर्भ राज्य आघाडी व केरोसिन हॉकर्स आपल्या मोर्चातून हल्लाबोल करतील. हिवाळी अधिवेशनाच्या तुलनेत या अधिवेशनात मोर्चाची संख्या कमी आहे.
शहराच्या चारही भागातून येणाऱ्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थाही चोख ठेवण्यात आली आहे. नागपुरात सुरू असलेले सिमेंट रस्त्यांची कामे, मेट्रो रेल्वेची कामे, यातच बुधवारपासून मुसळधार पावसाची वर्तवलेली शक्यता यामुळे मोर्चा व वाहतूक व्यवस्थेला फटका बसू नये म्हणून विशेष दक्षता घेण्यात आली आहे. मोर्चेकरांवर लक्ष ठेवण्यासाठी व सुरक्षेसाठी पोलिसांचे स्वत:चे ९६ सीसीटीव्ही जागोजागी बसविण्यात आले आहे. याशिवाय चौकाचौकातील कॅमेऱ्यांची नजरही मोर्चेकरांवर राहणार आहे. सोबतच ड्रोन कॅमेरे, हेल्मेट कॅमेऱ्यांची नजर मोर्चेकरांवर असणार आहे. नेहमीप्रमाणे एका मोर्चासोबत तीन पोलिसांचे पथक असणार आहे. हे पथक मोर्चा निघणाऱ्या  ठिकाणापासून ते त्यांना दिलेल्या ठिकाणापर्यंत सोबत राहणार आहे.
मुसळधार पाऊस आल्यास शाळेत मोर्चा
पोलीस उपायुक्त (विशेष शाखा) स्नार्तना पाटील यांनी ‘लोकमत’ला सांगितले, मुसळधार पाऊस राहिल्यास मोर्चेकरांंना थांबण्यासाठी मॉरिस कॉलेज टी पॉर्इंटवर असलेल्या दोन शाळांमध्ये त्यांची व्यवस्था केली जाईल. यासाठी या शाळांच्या दोन-दोन खोल्या राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

Web Title: 24 marches on the Vidhi Mandal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.