नागपूर-मुंबई दरम्यान उन्हाळ्यात २४ विशेष रेल्वेगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 11:56 AM2019-03-29T11:56:51+5:302019-03-29T11:57:12+5:30

उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून आणि प्रतीक्षायादी वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान २४ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

24 special trains in the summer between Nagpur and Mumbai | नागपूर-मुंबई दरम्यान उन्हाळ्यात २४ विशेष रेल्वेगाड्या

नागपूर-मुंबई दरम्यान उन्हाळ्यात २४ विशेष रेल्वेगाड्या

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उन्हाळ्यात प्रवाशांची होणारी अतिरिक्त गर्दी पाहून आणि प्रतीक्षायादी वाढल्यामुळे रेल्वे प्रशासनाने नागपूर-मुंबई-नागपूर दरम्यान २४ सुपरफास्ट विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०१०७४ नागपूर-मुंबई विशेष रेल्वेगाडी प्रत्येक रविवारी नागपूरवरून १४ एप्रिल ते ३० जून दरम्यान दुपारी ४ वाजता सुटेल. ही गाडी वर्ध्याला सायंकाळी ५.०८, धामणगावला ६, चांदूरला ६.२३, बडनेराला ७.२८, मूर्तिजापूरला ८.०८, अकोला ८.४५, शेगाव ९.१५, मलकापूर रात्री १० वाजता आणि मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला दुसऱ्या दिवशी सोमवारी सकाळी ८.२० वाजता पोहोचले. रेल्वेगाडी क्रमांक ०२०२१ मुंबई-नागपूर सुपरफास्ट विशेष रेल्वेगाडी मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसवरून प्रत्येक रविवारी १४ एप्रिल ते ३० जून दरम्यान रात्री १२.२० वाजता सुटेल. ही गाडी अकोला सकाळी ९.३८, मूर्तिजापूरला १०.०८, बडनेरा १०.५८, चांदूर ११.२६, धामणगावला ११.३८, वर्धा १२.१५ आणि नागपूरला दुपारी २.३० वाजता पोहोचेल. दोन्ही गाड्यात एकूण १७ कोच राहतील. यात १२ स्लिपर, ३ साधारण द्वितीय आणि २ एसएलआर कोचचा समावेश आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वेगाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Web Title: 24 special trains in the summer between Nagpur and Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.