नागपुरात निवडणुकीच्या कामात २४२ बसगाड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:49 AM2019-04-11T00:49:46+5:302019-04-11T00:50:39+5:30

गुरुवारी नागपूर लोकसभा क्षेत्रात मतदान होत असल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २४२ बसेस लावण्यात आलेल्या आहेत. बुधवार व गुरुवार असे दोन दिवस या बसेस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शहरातील काही मार्गांवरील बससेवा प्रभावित झाली आहे.

242 Buses engaged In Elections duty at Nagpur | नागपुरात निवडणुकीच्या कामात २४२ बसगाड्या

नागपुरात निवडणुकीच्या कामात २४२ बसगाड्या

Next
ठळक मुद्देकाही मार्गांवरील बससेवा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गुरुवारी नागपूर लोकसभा क्षेत्रात मतदान होत असल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाच्या २४२ बसेस लावण्यात आलेल्या आहेत. बुधवार व गुरुवार असे दोन दिवस या बसेस निवडणुकीच्या कामात व्यस्त असल्याने शहरातील काही मार्गांवरील बससेवा प्रभावित झाली आहे.
बुधवारी सकाळी मतदान केंद्रावर निवडणूक साहित्य पोहोचविण्याला सुरुवात झाली. त्यानंतर निवडणूक ड्युटीवरील कर्मचारी व अधिकाऱ्यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यात आले. यासाठी २४२ बसेस लावण्यात आलेल्या आहेत. नागपूर शहरात दररोज ‘आपली बस’च्या ३२० बसेस धावतात. यातील २४० बसेस कमी झाल्याने अतिरिक्त १२० बसेस लावण्यात आल्या. मात्र त्यानंतरही शहरातील वर्दळीच्या काही मार्गांवरील बससेवा प्रभावित झाली आहे.
निवडणुकीसाठी बसेस लावण्यात आल्याने महापालिकेच्या परिवहन विभागाला यातून जवळपास ७० लाखांचा महसूल जमा होणार आहे. यामुळे आर्थिक संकटातील परिवहन विभागाला थोडा दिलासा मिळणार आहे. ११ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी १० व ११ एप्रिलला २४२ बसेस लावण्यात आलेल्या आहेत. यातून परिवहन विभागाला महसूल मिळणार असला तरी, दोन दिवस बसफेऱ्या कमी होणार असल्याने शहरातील प्रवाशांना बुधवारी त्रास झाला. गुरुवारीही अशीच परिस्थिती राहणार आहे.
निवडणूक ड्युटीवरील कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रापर्यंत पोहोचण्यासाठी तसेच मतदान केंद्रावर लागणारे साहित्य नेण्यासाठी निवडणूक विभागाने आपली बसची सेवा घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परिवहन विभागाला पत्र प्राप्त झाले होते. त्यानुसार बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
१२० अतिरिक्त बसेसची व्यवस्था
नागपूर लोकसभा मतदान क्षेत्रातील सहा विधानसभा क्षेत्रात २४२ बसेस निवडणुकीच्या कामासाठी वापरल्या जाणार आहेत. याचे नियोजन करण्यात आले. दोन दिवस बसेस निवडणुकीच्या कामात राहतील. याचा विचार करता १२० बसेस अतिरिक्त सोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे शहरातील बस वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नसल्याची माहिती परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप यांनी दिली.

Web Title: 242 Buses engaged In Elections duty at Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.