विदर्भातील २.४८ लाख घरकुलांना मिळाले प्रकाशाचे ‘सौभाग्य’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2019 09:00 PM2019-03-04T21:00:39+5:302019-03-04T21:03:47+5:30

‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत विदर्भातील सर्वच २ लाख ४८ हजार ८७० घरकुलांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक ४२ हजार ७१३ वीजजोडण्या नागपूर जिल्ह्यात तर त्याखालोखाल ३५ हजार ७९२ वीजजोडण्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत.

2.48 lakh houses in Vidarbha got electricity 'saubhagya' | विदर्भातील २.४८ लाख घरकुलांना मिळाले प्रकाशाचे ‘सौभाग्य’

विदर्भातील २.४८ लाख घरकुलांना मिळाले प्रकाशाचे ‘सौभाग्य’

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यात ४२ हजारवर लाभार्थी : गडचिरोली ३५ हजारावर घरकुलांना जोडणी

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘प्रधानमंत्री सहज बिजली, हर घर योजना’ अर्थातच ‘सौभाग्य’ योजने अंतर्गत महावितरणच्या नागपूर परिक्षेत्रात १०० टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले असून या योजनेत विदर्भातील सर्वच २ लाख ४८ हजार ८७० घरकुलांना वीजजोडणी देण्यात आली आहे. यात सर्वाधिक ४२ हजार ७१३ वीजजोडण्या नागपूर जिल्ह्यात तर त्याखालोखाल ३५ हजार ७९२ वीजजोडण्या अतिदुर्गम गडचिरोली जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत.
२०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे विदर्भात एकूण ५७ लाख १९ हजार ३३८२ घरकुले होती, त्यापैकी १० आॅक्टोबर २०१७ पर्यंत ५४ लाख ८७ हजार ६३३ घरकुलांचे विद्युतीकरण पूर्ण झाले होते तर २ लाख ३१ हजार ७४९ घरकुले विजेपासून वंचित होती. विजेपासून वंचित नागरिकांना २४ तास वीज पुरवठा करण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री सहज बिजली हर घर योजना ‘सौभाग्य’ या महत्त्वाकांक्षी योजनेचा शुभारंभ २५ सप्टेंबर २०१७ रोजी दिल्ली येथे केला होता तर महाराष्ट्रात या योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ २३ डिसेंबर २०१७ रोजी नागपूर येथे करण्यात आला होता.
लाभार्थी कुटुंबांची पात्रता २०११ च्या सामाजिक, आर्थिक जातीच्या जनगणनेच्या आधारे निश्चित करण्यात आली. या अनुषंगाने विजेपासून वंचित असलेल्या विदर्भातील सर्वच २ लाख ३१ हजार ७४९ लाभार्थ्यांना वीजजोडणी देण्यात येऊन त्यापुढे जात ‘सौभाग्य रथ’ मोहिमे अंतर्गत महावितरणने फेब्रुवारी २०१९ च्या अखेरपर्यंत १७ हजार १२१ नवीन घरकुलांना वीजजोडणी दिल्याने या योजनेतील लाभार्थ्यांचा आकडा २ लाख ४८ हजार ८७० पर्यंत नेत १०० टक्के विद्युतीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण केले आहे. या योजनेच्या माध्यमातून शहरी व ग्रामीण भागातील विद्युतीकरण न झालेल्या प्रत्येक घरकुलाला वीज जोडणी दिली गेल्याने रोजगारांच्या संधीत वाढ होऊन स्त्रियांच्या दैनंदिन जीवनमानात सुधारणांचे नवीन दालन उघडले आहे.
गरिबांना मोफत, तर इतरांकडून केवळ ५०० रुपये शुल्क
सौभाग्य योजनेत आर्थिकदृष्ट्या दुर्बल लाभार्थ्यांना वीजजोडणी विनाशुल्क तर इतर लाभार्थ्यांना मात्र ५०० रुपये शुल्क आकारण्यात आले. हे ५०० रुपये संबंधित लाभार्थ्यांकडून त्याच्या बिलातून १० टप्प्यात वसूल करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांना घरातील अंतर्गत वायरिंगसह एक चार्जिंग पॉईंट, एक एलईडी दिवा मोफत देण्यात आला. तसेच ज्या ठिकाणी पारंपरिक विद्युतीकरण करणे शक्य नाही, अशा अतिदुर्गम भागातील घरांना सौरऊर्जा संचामार्फत वीजपुरवठा देण्यात आला आहे. या ठिकाणी अंतर्गत वायरिंगसह एक डीसी पंखा, पाच एलईडी दिवे आणि एक डीसी चार्जिंग पॉईंट मोफत देण्यात आला आहे. पंतप्रधान आवास योजना, शबरी योजना, रमाई योजना, आदिम योजना व इतर योजनेतून तयार झालेल्या घरांनासुध्दा मोफत वीजपुरवठा देण्यात आला आहे.

 

Web Title: 2.48 lakh houses in Vidarbha got electricity 'saubhagya'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.