घरकुलांसाठी २.५ एफएसआय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 01:27 AM2017-11-12T01:27:10+5:302017-11-12T01:27:53+5:30

प्रधानमंत्री आवास योजना किंवा शासनाने घोषित केलेल्या अन्य योजनांतर्गत स्वस्त घरे उभारण्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) सरसकट २.५ केला जाणार आहे.

2.5 FSI for Homeschool | घरकुलांसाठी २.५ एफएसआय

घरकुलांसाठी २.५ एफएसआय

Next
ठळक मुद्देस्वस्त घरे उभारण्यास मदत : खासगी जमीनधारकांना अतिरिक्त टीडीआर

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : प्रधानमंत्री आवास योजना किंवा शासनाने घोषित केलेल्या अन्य योजनांतर्गत स्वस्त घरे उभारण्यासाठी चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) सरसकट २.५ केला जाणार आहे. सोबतच खासगी जमीनधारकांनी शासनाच्या घरकूल योजनांसाठी आपली जमीन उपलब्ध केल्यास त्यांना मोबदल्यात अतिरिक्त टीडीआर दिला जाणार आहे.
याबाबतचा प्रस्ताव २० नोव्हेंबरला होणाºया महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे. सभागृहाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार आहे.
प्रधानमंत्री आवास योजना तसेच शासनामार्फत विविध प्रकारच्या घरकूल योजना राबविल्या जातात. अशा योजनांसाठी खासगी जमीन मालक आपली जमीन उपलब्ध केल्यास उक्त जमिनींना विकास आराखड्यातील प्रधानमंत्री आवास योजना वा शासनाने घोषित केलेल्या घरकूल योजनांसाठीचे आरक्षण समजण्यात येणार आहे. या जमिनीवर अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील आणि मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी घरे बांधण्याची योजना प्रस्तावित आहे.
सध्या काही योजनांना २.५ एफएसआय आहे. परंतु आता घरकूल योजनासांठी सरकट २.५ एफएसआय करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे प्रधानमंत्री आवास योजनासह अन्य घरकूल योजना राबविताना अडचणी येणार नाही. महापालिकेतर्फे प्रधानमंत्री आवास योजना, आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्प उत्पन्न गट, मध्यम उत्पन्न गटातील लोकांसाठी ५० हजार घरे उभारण्याचे प्रस्तावित आहे.
त्यामुळे अतिरिक्त एफएसआयचा प्रस्ताव सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.
यासाठी शहराच्या विकास नियंत्रण नियमात (डीसीआर) एक नवीन अनुसूची समाविष्ट करण्यात येईल. अंतिम संमतीसाठी हा प्रस्ताव सरकारकडे सादर केला जाईल.
मनपा व नासुप्रच्या प्रकल्पांना मदत
महापालिका व नासुप्रने फेबु्रवारी २०१६ मध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधण्याची योजना तयार केली होती. तसेच नासुप्रचा पाच हजार फ्लॅट उभारण्याचा प्रस्ताव आहे. यातील काही प्रकल्पांना सुरुवात करण्यात आली आहे. यात वाठोडा येथील २६४ सदनिका बांधकामाचा समावेश आहे. संबंधित निर्णयामुळे या सर्व प्रकल्पांमध्ये अतिरिक्त घरे बांधण्यास मदत होणार आहे.

Web Title: 2.5 FSI for Homeschool

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.