गरिबांसाठी २५ लाखांचा आमदार निधी वापरू द्यावा : नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2020 12:03 AM2020-04-03T00:03:15+5:302020-04-03T00:05:28+5:30

गरिबांना मदत करता यावी यासाठी २५ लाखांचा निधी आमदार निधीतून वापरण्याची आमदारांना परवानगी द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे.

25 lakh MLA's funds should be used for poor: Nitin Raut calls on CM | गरिबांसाठी २५ लाखांचा आमदार निधी वापरू द्यावा : नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

गरिबांसाठी २५ लाखांचा आमदार निधी वापरू द्यावा : नितीन राऊत यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Next
ठळक मुद्देशिधापत्रिका नसलेल्यांनादेखील अन्नधान्य वाटप व्हावे

लोकमत  न्यूज  नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’ संकटामुळे गरीब जनतेचे हाल होत आहेत. शिधापत्रिकाधारकांना तर रेशन दुकानातून धान्य पुरवठा व्हायलाच हवा. मात्र ज्यांच्याकडे काही कारणांमुळे शिधापत्रिका नसेल त्यांनादेखील या आपात्कालीन परिस्थितीत अन्नधान्य देणे गरजेचे आहे. गरिबांना मदत करता यावी यासाठी २५ लाखांचा निधीआमदारनिधीतून वापरण्याची आमदारांना परवानगी द्यावी, अशी मागणी ऊर्जामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गुरुवारी पत्रदेखील लिहिले.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम २०१३ अंतर्गत समाविष्ट न झालेले दारिद्र्य रेषेवरील शिधापत्रिकाधारकांना रेशन दुकानातून धान्य पुरवठा करण्यात यावा. तसेच झोपडपट्टीत राहणारे, सायकलरिक्षा चालक, ऑटोचालक, चहाटपरी चालक, पानठेला चालक, बुटपॉलिश करणारे, विटभट्टी कामगार, औद्योगिक मजूर, निराधार यांच्यापैकी अनेकांकडे शिधापत्रिका नाहीत. त्यांच्याकडे शिधापत्रिका नसल्याने सवलतीच्या दरात तसेच मोफत धान्य वितरणाचा लाभ त्यांना घेता येणार नाही. हे लोक प्रचंड अडचणीत आहेत. अनेक जण नागपूर शहर सोडून गावांकडे स्थलांतरित होत आहेत. यासंदर्भात सर्वच पक्षाच्या आमदार व लोकप्रतिनिधींनी माझ्याकडे भावना व्यक्त केल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या कुटुंबांना देखील आपात्कालीन स्थितीत अन्नधान्य पुरविले पाहिजे, अशी मागणी नितीन राऊत यांनी केली.
यावर उपाय म्हणून आमदार निधीतून तात्काळ आमदारांना किमान २५ लाख रुपयांचा निधी वापरण्याची परवानगी देण्यात यावी. यासंबंधात शासनाने लगेच धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती राऊत यांनी पत्राच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.

केबल शुल्क विलंबाने घ्यावे
‘लॉकडाऊन’ कालावधीत केबल टीव्हीचालकांनी ग्राहकांकडून मासिक शुल्क एक महिना विलंबाने वसूल करावे. तसेच या काळात कुठलेही ‘कनेक्शन’ खंडित करू नये, अशी मागणीदेखील पालकमंत्र्यांनी केली.

Web Title: 25 lakh MLA's funds should be used for poor: Nitin Raut calls on CM

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.