२५ तालुक्यांत रोजगार निर्मिती योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 12:06 AM2017-10-31T00:06:01+5:302017-10-31T00:06:25+5:30

विकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याकरिता ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे.

25 Taluka level employment generation scheme | २५ तालुक्यांत रोजगार निर्मिती योजना

२५ तालुक्यांत रोजगार निर्मिती योजना

Next
ठळक मुद्देमानव विकास आयुक्त भास्कर मुंढे : ग्रामीण जीवनमान उंचावण्यावर कार्यशाळेत चर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : विकासाची संकल्पना प्रत्यक्षात उतरविण्याकरिता ग्रामीण भागाचा विकास होणे आवश्यक आहे. ग्रामीण जीवनमान उंचावण्यासाठी शाश्वत विकास आणि रोजगार निर्मिती आवश्यक आहे, असे मानव विकास आयुक्त भास्कर मुंढे यांनी येथे सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालय आणि विदर्भ विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने निवडक २५ तालुक्यात रोजगार निर्मि$तीसाठी विशेष योजना राबविण्याबाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयुक्त भास्कर मुंढे बोलत होते.
यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार, जिल्हाधिकारी आशुतोष सलील (चंद्रपूर), जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी (भंडारा), जिल्हाधिकारी अभिमन्यू काळे (गोंदिया), खादी व ग्रामद्योग मंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रिचा बागला, मुख्य कार्यपालन अधिकारी जितेंद्र पापळकर (चंद्र्रपूर), रवींद्र्र ठाकरे(गोंदिया), मनोज सूर्यवंशी (भंडारा), शांतनू गोयल (गडचिरोली), विदर्भ वैधानिक विकास महामंडळाच्या सदस्य सचिन डॉ. निरुपमा डांगे, महाबळेश्वर येथील मधुमक्षिकापालनचे संचालक दिग्विजय पाटील, इन्स्टिट्यूट आॅफ व्हिलेज एन्टरप्राईज डेव्हलपमेंट फॉर हॅन्डीक्राफ्ट आर्टिसन्सचे सुनील जोशी, महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. टी.एस.के. रेड्डी, पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे प्रा. डॉ. एस. बी. कविटकर, डॉ. मुकुंद पाटील, मत्स्य विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सत्यजित बेलसरे, रेशीम संचालनालयाचे संचालक संजय मीणा उपस्थित होते.
राज्यातील एकूण १२५ तालुक्यांपैकी निवडक २५ तालुक्यात रोजगार निर्मितीसाठी एक कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. त्यात नैसर्गिक साधनसंपत्ती व पारंपरिक व्यवसायातून रोजगार निर्मिती करण्याकरिता विविध योजना राबविता येतात. त्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्याकरिता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मधुमक्षिकापालन व्यवसाय, ग्रामीण हस्तकला, बांबूपासून विविध वस्तूनिर्मिती, वैरण विकास, कुक्कुटपालन व्यवसाय, मत्स्यखाद्य व्यवसाय, रेशीम उद्योग या विषयांचे सादरीकरण करण्यात आले. रोजगार निर्मितीच्या योजना तयार करून डिसेंबर २०१७ पूर्वी सादर कराव्यात, अशा सूचना आयुक्त मुंढे यांनी यावेळी केल्या.
नागपूर विभागातील ११ तालुक्यांचा समावेश
यावेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले की, या योजनेत नागपूर विभागातील ११ तालुक्यांचा समावेश आहे. यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील पाच, गडचिरोली जिल्ह्यातील दोन, गोंदिया जिल्ह्यातील दोन तालुके तसेच भंडारा जिल्ह्यातील दोन तालुक्यांची रोजगार निर्मितीच्या कार्यक्रमासाठी निवड करण्यात आली आहे.

Web Title: 25 Taluka level employment generation scheme

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.