नागपूर रेल्वेस्थानकावर अचानक आल्या २५ गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 02:02 AM2020-05-23T02:02:23+5:302020-05-23T02:05:10+5:30
इटारसीत शुक्रवारी रेल्वे वाहतूक वाढल्यामुळे भुसावळवरून काही गाड्यांना नागपूरमार्गे पाठविण्यात आले. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये खळबळ उडाली. जवळपास २५ रेल्वेगाड्या नागपूर मार्गे दरभंगासाठी रवाना झाल्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : इटारसीत शुक्रवारी रेल्वे वाहतूक वाढल्यामुळे भुसावळवरून काही गाड्यांना नागपूरमार्गे पाठविण्यात आले. यामुळे नागपूर रेल्वेस्थानकावर रेल्वे कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा दलामध्ये खळबळ उडाली. जवळपास २५ रेल्वेगाड्या नागपूर मार्गे दरभंगासाठी रवाना झाल्या. कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे बहुतांश कामगार आणि सामान्य नागरिकांसाठी श्रमिक स्पेशल आणि राजधानी एक्स्प्रेस चालविण्यात येत आहेत. मोजक्याच रेल्वेगाड्या धावत असल्यामुळे रेल्वेस्थानकावर कामही कमी असते. परंतु शुक्रवारी सायंकाळी रेल्वेस्थानकावरील कर्मचाऱ्यात धावपळ उडाली. रेल्वेस्थानकावर अचानक रेल्वेगाड्यांची गर्दी वाढली. बिहारच्या रेल्वेगाड्या आतापर्यंत भुसावळ मार्गे इटारसी, जबलपूर मार्गे बिहारला जात होत्या. परंतु या मार्गावर रेल्वेगाड्यांची संख्या वाढल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे भुसावळवरून बिहारला जाणाºया २५ रेल्वेगाड्या नागपूरमार्गे बिलासपूर, बिहार, दरभंगा पाठविण्यात आल्या. शनिवारीही हीच स्थिती राहणार असल्याची शक्यता आहे.