स्मार्ट सिटीचे २५० कोटी नासुप्रकडून घेणार

By admin | Published: December 30, 2015 03:18 AM2015-12-30T03:18:47+5:302015-12-30T03:18:47+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पात एक हजार कोटी रुपयांच्या भरवशावर ३५०० कोटी रुपयांची कामे करण्याची तयारी करण्यात आली आहे.

250 crores of smart city to take from Nasuprum | स्मार्ट सिटीचे २५० कोटी नासुप्रकडून घेणार

स्मार्ट सिटीचे २५० कोटी नासुप्रकडून घेणार

Next

मनपाच्या सर्वसाधारण सभेत निर्णय : राज्य शासनापुढे ठेवणार प्रस्ताव
नागपूर : स्मार्ट सिटी प्रकल्पात एक हजार कोटी रुपयांच्या भरवशावर ३५०० कोटी रुपयांची कामे करण्याची तयारी करण्यात आली आहे. यासाठी अविकसित ले-आऊट नियमित करण्यासाठी १२० रुपये प्रति वर्गफूट शुल्क आकारण्यात येईल. याशिवाय लँडपुलिंगच्या मदतीने जमा होणारी जमीन आदींची विक्री करून निधी जमविला जाणार आहे. तरीही मनपाला आपल्या हिश्श्यातून २५० कोटी रुपये पाच वर्षात लावावयाचे आहे. स्मार्ट सिटीमध्ये सामील आऊटर भाग हे नासुप्रच्या अधिकार क्षेत्रात येतात. यामुळे मनपाच्या हिश्श्याचे २५० कोटी रुपये नासुप्रद्वारा चुकते करण्यात यावे, अशी मागणी केली जाईल, असा निर्णय मंगळवारी आयोजित मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला.
सर्वसंमतीने स्मार्ट सिटी प्रकल्पाला मंजुरी प्रदान करण्यात आली. विरोधी पक्षानेही स्मार्ट सिटीची संकल्पना योग्य असल्याचे सांगितले, परंतु त्याच्या अंमलबजावणीवर मात्र शंका उपस्थित केली. नासुप्रतर्फे २५० कोटी रुपये चुकविले जाण्याचा प्रस्ताव मनपातर्फे राज्य शासनाला पाठवून उपयुक्त दिशानिर्देश जारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मंगळवारी स्मार्ट सिटीवर सभागृहात मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी प्रेझेंटेशन सादर केले. त्यानंतर नगरसेवकांनी काही सूचना केल्या. तर काही नगरसेवकांच्या शंकांचे निराकरण करण्यात आले. चर्चेत सहभागी बहुतांश नगरसेवकांनी अविकसित ले-आऊटसाठी नासुप्रला थेट जबाबदार ठरविले. स्मार्ट सिटीमध्ये शहराच्या संतुलित विकासावर लक्ष देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
प्रेझेंटेशनदरम्यान आयुक्त हर्डीकर यांनी सांगितले की, स्मार्ट सिटी प्रकल्प चरणबद्ध पद्धतीने अमलात आणला जाईल. यासाठी सर्वप्रथम अविकसित ले-आऊटवर लक्ष दिले जाईल. एरिया बेस्ड डेव्हलपमेंटसाठी ३३५१ कोटी रुपये आणि पॅन सिटी प्रकल्पासाठी २२३ कोटी खर्च करण्याची योजना आहे. पहिल्या चरणात भरतवाडा, पुनापूर, पारडी येथील ३.८५ वर्ग किमीचे क्षेत्र विकसित केले जाईल. त्यानंतर नारा-नारी आणि तिसऱ्या चरणात मानेवाडा, बाबुळखेड्याचा विकास करण्यात येईल. १२.५० वर्ग किमी क्षेत्राचा विकास करण्यात येणार आहे.
१३ सदस्यीय स्पेशन पर्पज व्हेईकल (एसपीवी) ची स्थापना करण्यात येईल. ही यंत्रणा स्मार्ट सिटी प्रकल्पावर लक्ष ठेवेल. (प्रतिनिधी)

Web Title: 250 crores of smart city to take from Nasuprum

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.